(पृष्ठ संख्या – १२७)
द ओल्ड मॅन अँड द सी या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा हा अनुवाद आहे. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. समुद्रावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळ्याची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा यांच्यातील लढ्याचे हे चित्रण आहे. ८४ दिवस होऊनही जाळ्यात मासा सापडलेला नसतो. हे तो आपले दुर्भाग्य समजत असतो. या घटनेपासून पुस्तकाची सुरवात होते.
हे पुस्तक भगवद्गीते सारखं आहे, तुम्ही आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात आहात त्यानुसार तुम्हाला ह्यातून मिळणारा बोध वेगवेगळा असेल.
एका म्हाताऱ्या कोळ्याची हि गोष्ट तुम्हाला आयुष्यातली मुलभूत सत्य सांगून जाते. त्याच्या खडतर प्रवासात टिकाव धरण्यासाठी हि मुल्ये त्याला गरजेची आहेत.
आशावादी लोकं कधीच भयानक समुद्र भरतीची स्वप्न बघत नाहीत. ह्यात आपण कोणालाच दोष देऊ शकत नाही. Better to sail an ocean of hope than a sea of despair.
पुस्तक सांगतं कि, कसं कोळी युद्ध जिंकतो पण बक्षीस मात्र त्याला मिळत नाही. हा एक असा अद्वीतीय संदेश आहे, कि ज्यात तुम्हाला समजेल कि कशा प्रकारे ‘माणूस उध्वस्त होतो, तरी पण हरत नाही’. सतत बदलत जाणाऱ्या दुनियेतली काही मुलभूत तत्व, पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या इच्छे पर्यंत जगलेलं आयुष्य, यश-अपयश ह्या दोन्हीची असणारी योग्य सांगड ह्यात वाचायला मिळेल.
पुस्तकातील माझे आवडते विचार-
“You did not kill the fish only to keep alive and to sell for food, he thought. You killed him for pride and because you are a fisherman. You loved him when he was alive and you loved him after. If you love him, it is not a sin to kill him. Or is it more”
“Most people were heartless about turtles because a turtle’s heart will beat for hours after it has been cut up and butchered. But the old man thought, I have such a heart too.”
“If the others heard me talking out loud they would think that I am crazy. But since I am not, I do not care.”
“Perhaps I should not have been a fisherman, he thought. But that was the thing that I was born for.”
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.
स्वप्निल खेडेकर
लहान वयातच बऱ्याच वरच्या लेव्हलचा विचार करणारा. असामान्य व्यक्तिमत्व. उद्या उठून तुम्हाला स्वप्निल खेडेकर नामक कोणी साधू-संत दिसले तर दचकून जाऊ नका.
Leave a Reply