Tag: marathi book summary
-
१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व – अनुजा जोशी लिमये
स्वामी विवेकानंद एका ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणत आणि रोज ते परत करत. एक दिवस ग्रंथालयातील कर्मचाऱ्याने विचारले, ‘तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी घेऊन जाता की बघण्यासाठी?’ यावर विवेकानंदांनी उत्तर दिले, की ‘वाचण्यासाठी. तुम्ही मला त्या पुस्तकातलं काहीही विचारा.’ कर्मचाऱ्याने एक पान उघडले आणि त्याचा क्रमांक सांगून विचारले, ‘सांग, त्यावर काय लिहिले आहे?’ आणि विवेकानंदांनी न बघता…
-
यक्षांची देणगी – विज्ञानकथांचा खजिना
डॉ. जयंत नारळीकरांचं ‘यक्षांची देणगी’ हे एक एव्हरग्रीन पुस्तक आहे. तुम्ही आधी कितीही वेळा ते वाचलं असेल, तरी एकदा हातात घेतलं की पुन्हा पुन्हा वाचावं वाटेल असा या पुस्तकाचा चार्म आहे. सातवीत असताना पहिल्यांदा ‘यक्षांची देणगी’ हे पुस्तक वाचलेलं आणि तो अनुभव मी आजही विसरू शकत नाही. मराठीत वाचलेलं हे माझं पहिलंच विज्ञानकथांच पुस्तक होतं…
-
‘इकिगाई’ – दीर्घायुषी, निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य
आपण नेहमी स्वतःला प्रश्न विचारत असतो,की ‘माझ्या जीवनाचा उद्देश काय? फक्त जास्त वर्ष जगणं हेच ध्येय आहे की जीवनाचा या पलीकडेही आणि यापेक्षाही मोठा काहीतरी उद्देश आहे?’ काही लोकांना त्यांना काय पाहिजे आहे, काय मिळवायचं आहे हे पक्कं ठाऊक असतं आणि ते त्या ध्येयाने वेडे होऊन जगत असतात तर काहींपुढे जगण्याचं काहीच ध्येय किंवा उद्दिष्ट…
-
सेवानिवृत्त झालात! पुढे काय?
वडील निवृत्त होतात तेव्हा मुलं मोठी झालेली असतात. निवृत्तीआधी ते १०-१२ तास नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. तेव्हा बायकोचे,मुलांचे व घरातील इतर सदस्यांचे एक वेळापत्रक किंवा काम ठरलेले असते. वडील नोकरी करत असताना घरी आले की, मुलं मोठी झाली असतील तरी, ‘बाबा आलात का?’ इतकं तरी विचारतात, पत्नी वाट पहात असते, नाश्ता, जेवण इतर तयारी हसतखेळत किंवा…
-
कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य
विद्या बालनच्या ‘शकुंतलादेवी’ सिनेमामध्ये शकुंतलादेवी जेव्हा पहिल्यांदा लंडनला जातात तेव्हा त्या तेथील एका गेस्ट-हाऊस/लॉजिंग-बोर्डिंग मध्ये काही दिवस राहिलेल्या दाखवलंय. त्या बोर्डिंगच्या मालक एक नऊवारी नेसलेल्या मध्यमवयीन महाराष्ट्रीय महिला आहेत, हे बघून मला खुप आश्चर्य वाटलेलं. म्हणजे लंडनसारख्या शहरात इतक्या जुन्या काळात एका मराठी महिलेच्या मालकीचं लॉजिंग-बोर्डिंग असणं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे ना! एका दृश्यात नऊवारीवर…
-
ती फुलराणी
पुलंच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा किंवा पुस्तकाचा विषय निघाला, आणि तुम्ही ते नाटक पाहिलं असेल-नसेल, पुस्तक वाचलं असेल-नसेल तरी मंजुळेचं पुढील स्वगत तुम्ही एकदातरी नक्कीच ऐकलं असेल. ‘असं काय मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी? थांब…. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा! मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर तुजं…
-
प्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’
‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक इतकं प्रेरणादायी का वाटतं, याबद्दल उत्तर देताना एकदा ‘वीणा गवाणकर’ मॅडम बोलल्या होत्या की, “आपल्याला धाडस आवडतं. मला मुलांना हेच सांगायचं होतं, की धाडस किती प्रकारचं असतं? केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे फक्त धाडस नाही. धाडस, परिस्थितीवर मात करणं असतं. आपण जो एक निर्णय घेतलाय, त्यावर…