मुळात मी लिहित वगैरे नाही…लिहिण्याचा आणि माझा संबंध फक्त प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी यायचा…परीक्षेच्या वेळी…असो…आज लिहावसं वाटतंय…याचं कारण म्हणजे..एक व्यक्ती आहे..
खरं सांगायचं तर मला त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा अगदी मनापासुन होती…किंबहुना ती इच्छा खुप दिवसांपासुन होती..अगदी कॉलेजच्या दिवसांपासुन…आणि माझे त्या दृष्टीने प्रयत्न चालु देखील होते…परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे भेट घडुन येत न्हवती…
शनिवारी रात्री पुन्हा एकदा मी नेहमी प्रमाणे तिलाच Whatsapp message करून पाहिला…2.28 AM ला….
“Sunday …Possible …Please ..???”
मला तिचा Positive Reply येईल याची अपेक्षा अजिबात न्हवती…म्हणुन मी Phone बाजुला ठेवला आणि झोपी गेलो…
सकाळी उठुन 9.15 AM ला…मी पहिली गोष्ट check केली कि message read झाला आहे कि नाही…पण तो deliver झाला न्हवता…पुन्हा एकदा थोडसं वाईट वाटल..पण आता सवयच झाली होती वाईट वाटण्याची…
मी विचार करत होतो की आजचा दिवस कसा spend करायचा याचा विचार करत होतो इतक्यात 9.50AM ला तिचा reply आला…unexpectedly expected reply आला होता…
“Yes I have classes at dadar after that I will meet u ….Around at 1 PM “….
मी साफ उडालो…पुन्हा check केला reply….reply तोच होता…unexpectedly expected…
मी जरापण विचार न करता Reply केला…“Ohk …Dat will be fine …”
मुळात मला भानावर यायला थोडा वेळ लागला..आणि जसा भानावर आलो तसे माझ्या डोक्यात विचार चालु झाले..खुप सारे…
First thought …”काय करूया…1 PM ..from पनवेल to दादर…ते देखील इतक्या उन्हाच्या वेळेस…cancel करूया का जायचं…”
Second thought “नको नको…जायला हवा…unexpectedly expected reply परत कधी येईल याची शाश्वती न्हवती…” so it took Me १०-१५ minutes to make my mind ready “…
एव्हाना 10.15 AM झाले होते…आणि मी विचारच करत होतो…
तितक्यात पुन्हा तिचा message आला … “Hmm I will let u know …”
माझा Reply @ 10.19 AM .. (y)(y)
माझं mind calculation चालू झाला… 1 PM ला दादर means मला काही करून 11.30 AM ला घरातुन निघावं लागणार होता…it means… माझ्याकडे फक्त १ तास होता..to get ready…and it was sufficient time for me to get ready… जरी माझ्याकडे एक तास होता…मला बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या…Bath Shave etc etc..
Next moment ला डोक्यात विचार आला …Fuck आज रविवार आहे…Megablock असणार आणि लगेच M -Indicator वर harbour lineचं schedule check केला …”KURLA-VASHI UP AND DN HARBOUR LINES FROM 11.00 AM to 3 PM”…आणि मला कळून चुकलं…आज लोचा होणार आहे…दादरला पोहचता..पोहचता..
काहीही वेळ न दवडता मी तयारी चालु केली आणि 11 ला घर सोडलं…अर्धवट पोहे खाऊन आणि घोटभर चहा घेऊन…आणि आईच्या पुर्ण शिव्या खाऊन…(कारण मी weekends ला पण Mostly घरी नसतो..)
तडक माझ्या नेहमीच्या saloon मध्ये गेलो…मला विचित्र वाढलेली दाढी घेऊन जायचं न्हवतं…त्याला बोललो “बाबा लवकर कर…चांगली कर…जरा घाई आहे”…नेमका तो busy होता….तिथे वेळ गेला थोडाफार अजुन…सगळं आटपून मी 11.30 AM ला highway ला आलो…
First Class Train Travel ची सवय लागलेला मी आज मिळेल त्या vehicle ने दादर ला जायला ready होतो….फक्त मला वेळेत पोहोचायचं होता…थोडा वेळ वाट पाहिली आणि मला लाल डब्बा मिळाला..मी बोललो …ठीक आहे …लाल डब्बा तर लाल डब्बा..Let’s go … इथ पर्यंत सगळ ठीक होता …मी खुप जास्त nervous होतो….खुप जास्त विचार करत होतो… एप्रिल महिन्यातल्या त्या भर उन्हाळ्याच्या दिवशी वेळ त्याचा वेळ घेत पुढे जात होता आणि मी फक्त विचार करत होतो…
Around …Chembur ला आलो असेन आणि पुन्हा watsapp आला….@12.25PM “Hey my classes will get over in 5 mins”…
माझा reply…@12.26PM:. “M on my way..Chembur..Where to meet…Dadar East or west???”
Ticha Reply @12.30 PM…“Dadar east ..Come fast I dnt have much time..”
माझा reply..@12.31PM: “Cool..I will be reaching in sometime….I thought 1 PM”
Ticha Reply @12.33 PM….“Ok..Fine..”
माझा reply..@12.33PM… “Thanks..”
वास्तविक पाहता मी लाल डब्ब्यामध्ये बसुन 27 Minutes मध्ये…from Chembur…कुठूनही दादर ला पोहचत न्हवतो…माझ्या Nervousness आणि काळजी मध्ये आणखीन भर पडली….मी तडक लाल डब्बा सोडला आणि CAB pakadali… माझ पहिल वाक्य…”दोस्त दादर जाना है…please जल्दी चल…urgent है…”
(Meanwhile I changed my shirt in the CAB)
Ticha Watsapp @12.40 PM…“There is one coffee shop opposite pramanik..Dadar East..I am waiting there..”
माझा reply..@12.41PM…“Dadar East..Ohk..M in cab only…”
Ticha Reply @12.47 PM..“Ok”
या संपुर्ण प्रवासामध्ये …मला फक्त एकच भीती होती ….यार ती निघुन न जावी…from चेंबुर till दादर…हा आजचा २० minutes चा प्रवास मला आयुष्यभर लक्षात राहील…कारण…मी खूप जास्त काळजीत होतो… आणि हि काळजी मी पहिल्यांदा अनुभवत होतो…मला फक्त एकच भीती होती ….यार ती निघुन न जावी…त्या २० minute मध्ये माझ्या CAB मध्ये येणारा प्रत्येक सिग्नल, Bike वाला आणि जो कोणी मध्ये येत होता…त्यांना मी शिव्या देत होतो… कोसत होतो…आजच तुम्हाला मध्ये यायचंय….मला फक्त दादर east चा प्रामाणिक दिसत होता…मला तिथे लवकरात लवकर पोहोचायचं होता…दादर TT ला आल्यावर…जीवात जीव आला..12.52 PM झाले होते…मी तत्काळ message केला.. “Reached at TT ….”
Ticha Reply @12.53 PM….“Ok…”
जीवात आणखीन जीव आला..Taxi मध्ये बसूनच मी त्या प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे आभार मानले… As usual दादर TT च्या signal ने पुन्हा एकदा शिव्या खाल्या…कारण त्याने 5 पेक्षा जास्त minutes घेतले होते…..12.57PM झाले होते… आणि माझ्याकडे ३ minutes होते…12.59 PM ला मी प्रामाणिकच्या समोर उतरलो…..प्रामाणिकपणे सांगायचं तर…That moment…that particular moment…when I saw her..was the moment of my life and I will never ever forget that moment……
” the PURSUIT OF HAPPYNESS” moment for me…
Exactly 1 PM ला आम्ही coffee shop मध्ये गेलो…..आत मध्ये Enter केल्या केल्या आम्ही बाजुच्याच एका tableवर बसलो…काही वेळ मी शांत बसलो…मागवलेलं थंडगार पाणी संपवलं… She decided to order Cold Coffee…. बरंच काही बोल्लो…आता सगळे topic आठवत पण नाही…काय काय बोल्लो ते ….पण एक गोष्ट मात्र नक्की आहे.. खुप चांगलं वाटत होतं…खुप सही वाटत होतं….I wish I could have spent more time over there with her…We were there for 45 minutes. Good 45 minutes probably… कधीना कधी ती वेळ संपणारच होती…आमचं बोलुन झाल्यावर आम्ही बिल मागवल… २५२ रुपयांचं ते बिल pay करण्यासाठी तिने CARD काढले and she gave it to waitress for bill payment… मी शहाणपणा करत ते बिल परत घेतले…gave her card back and I offered my card…
“Only Cash Sir…” Waitress replied and that moment I understood the meaning of embarrassment…My bad she has to pay the bill…आजकल कोण cash carry करतं असा म्हणत मी थोडंस justify करण्याचा प्रयत्न केलं कारण CABच्या चक्करमध्ये मी सगळी CASH संपवुन बसलो होतो आणि बाकीच्या सगळ्या धावपळीत ATM मधुन cash काढायची राहुन गेली होती…
तिने बिल pay केले…आम्ही Coffee shop बाहेर आलो आणि सरळ दादर stationच्या दिशेने निघालो…मला आठवत नाही आम्ही काय discuss केले..आम्ही career बाबत चर्चा केली असावी… Coffee shop ते दादर station हे अंतर फार तर फार 5 minutesचं असावं…पण मला हे अंतर कधीच संपूच नये असं वाटत होतं…दादर station ला तिला भायखळा fast पकडायची होती…निरोप घेणे तर भागच होते…म्हणुन निरोप घेतला खरा…पण माझ्या डोक्यात विचारचक्र चालू झाला…मला पनवेल to दादर असा प्रवास करायला मिळेल का..???….मला तिच्यासोबत बसुन प्यायलेल्या Cold Coffeeचं बिल भरायला मिळेल का..???….Only Cash sir असा म्हणणाऱ्या waitress ला झटकन cash काढून देत येईल का…??
स्वतःच्या मनाला समजावत मी शिवाजी मंदिर च्या दिशेने पावले टाकायला चालू केली….
त्यांचे खरे-खोटे चेहरे , दाखवायचे आणि लपवायचे स्वभाव तो ओळखतो.
मराठी भाषेवर त्याचं अतूट प्रेम.
वाचन-लिखाण-नाटक-चित्रपट ….सर्वच.
त्याच्या लिहण्यात तुम्हाला बऱ्याचदा ‘तुम्ही’ दिसाल.
कारण त्याचं म्हणणं एकदम क्लिअर आहे, सर्वसामान्य असलो तरी काय झालं,
आपल्या कथेत ‘हिरो’ आपणच !!
Leave a Reply