या मोर्चा मधे
इथं भांडण चाल्लीत, म्हणे ही सारी दलीत,
पर मरणार माणुस..
या मोर्चा मधे!
.
.
मरणारा मारणारा, जातीला तो सांगणारा,
व्यर्थ ओरडणारा तूच, कोण उच्च कोण नीच,
कोणी केसाला खेचील, कोणी देशाला विकिल,
पोरका तूच होशील वेड्या..
या मोर्चा मुळे
.
.
का दगड़ मारीला, कसा कागद फाडीला
झाला जनावर तूच, खून त्याची आहे हीच,
का तू पेटविले त्याला, का तू उगारला हात,
कोणा ठावे इतिहास, किती खरा किती भास..
या मोर्चा मधे
.
.
झाली वर्ष पूरी किती, झाली केवढी प्रगती,
उल्टी मोजत राहिला, दगड़ा बेल तू वाहिला,
किती समजले तूला, फुले शाहू आंबेडकर,
म्हणून आलास तू इथे?
या मोर्चा मधे..
.
.
इतिहासी कोणी होता, वर्तमानी कोणी सोसे,
तुला समजावू ते कसे, कुठे कोणाचे रे ठसे,
केले अत्त्याचार तूला, हे सांगितले कोणी,
शाहानिशा तरी करा, मगच मोर्चाला धरा,
आज आहेस दलित, गेल्या जन्मी ही होतास,
समजले तुला कसे.?
या मोर्चा मधे..
.
.
कोणा ठावे तू असशील, ब्राम्हण वा त्यो मराठा
कधी विचारले कोणा, तुझ्या आले का ते ध्याना,
दगड़ तू आहे खरा, म्हणून दगड़ मारीला
बुद्धि हीन तुझा हात, का तू मारलीस लात,
डोळ्याला तू दिला डोळा, रक्ता सांडले तू रक्त
म्हणे भिमाचा हा भक्त, पोरखेळ झाला फक्त,
या मोर्चा मुळे!
.
.
भीम होता का रे असा,
भीमा का तू लाजविले,
काळे फासलेस त्यासी,
या मोर्चा मधे..
.
.
.
.
ता. क. :- कवीच्या इतर कविता पुस्तक स्वरुपात वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अप्रतिम कविता…
आभारी आहे निलेश :).. आम्हाला अशा प्रतिक्रियांमुळे अजून चांगल्या प्रकारचे ब्लॉग्स लिहिण्यास प्रोत्साहन मिळते!
Chaan kavita aahe
🙂 thank you .. mitran sobat nakki share kar