malala samanyanmadhlya asamanyatvachi kahani

‘मलाला’- सामन्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी!


शस्त्रांच्या साहाय्यानं तुम्ही दहशतवाद्याला मारू शकता; पण शिक्षणाच्या मदतीनं तुम्ही दहशतवाद नष्ट करू शकता. – मलाला युसूफझई.

वयाच्या सतराव्या वर्षी ‘नोबेल शांतता पुरस्कारा’सारख्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित झालेल्या आणि अवघ्या १४व्या वर्षी क्रूर तालिबान्यांसमोर त्यांच्याशी झगडण्यासाठी निडरपणे उभं राहण्याचं धाडस करणाऱ्या ‘मलाला युसूफझई’ची कहाणी जात-पात, देश-प्रदेश, वय या सगळ्याचं बंधन तोडून जगातल्या प्रत्येकाला तिची दखल घ्यायला भाग पाडते.

‘एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एक लेखणी अवघं जग बदलायला पुरेसे आहेत.’ असे विचार ठामपणे सगळ्या जगासमोर मांडणाऱ्या ‘मलाला युसूफझई’चा आज (१२ जुलै) जन्मदिवस. त्यानिमित्ताने ऋतुजा बापट-काणे यांनी लिहिलेल्या ‘मलाला – सामान्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी!’ या पुस्तकाचा हा आढावा.

मलालाचे बालपण, तालिबानी दहशतवाद, या दहशतवादाला आणि तालिबान्यांनी स्त्रीशिक्षणविरोधी कायद्याच्या अन्यायाला आपल्या डायरी मधून आणि भाषणांमधून मलालाने फोडलेली वाचा आणि तिच्या या साहसासाठी १५ व्या वर्षी तिच्यावर झालेला हल्ला, या हल्ल्यामुळे डोक्याच्या कवटीला बसलेला मार आणि त्यामुळे स्मरणशक्ती, वाचा, ऐकण्याची शक्ती आणि तात्पुरत्या हरवलेल्या चेहऱ्याच्या संवेदना या सगळ्यावर मात करत पुन्हा आपल्या कार्याला झोकून देण्याचा प्रवास, तिचे दहशतवाद विरोधी आणि शिक्षणाचे महत्व जाणणारे विचार, ‘मलाला’ला मिळालेले पुरस्कार, तिची भाषणं, नोबेल सन्मान, बर्मिंगहमला स्थायिक होण्याचा निर्णय या सगळ्याचं लेखिकेने अतिशय सोप्प्या भाषेत आणि चित्ररूपाने वर्णन केलं आहे.

या पुस्तकातील ‘मलाला’च्या वडिलांनी, झियाउद्दीन यांनी दिलेलं एक भाषण देखील वाचण्यासारखं आहे. त्यात ते म्हणतात, “आमच्या समाजात खासकरून ग्रामीण भागात मुलीच्या जन्माचा आनंद साजरा केला जात नाही. मुलींना मोठ्या होताना देखील आपल्या परिघात राहा अशीच शिकवण दिली जाते; पण आमच्या घरी मात्र आम्ही मलालाच्या जन्माचा आनंद धुमधडाक्यात साजरा केला. आम्ही तिला केवळ शिक्षण मिळवण्यासाठी नाही तर तिला स्वतःची एका स्वतंत्र व्यक्तीच्या रुपात ओळख व्हावी यासाठी शाळेत घातलं. आमच्या पितृसत्ताक समाजपद्धतीमध्ये वडिलांना मुलाच्या नावानं ओळखलं जातं; पण मला मात्र माझ्या मुलीच्या नावानं ओळखलं जातं या गोष्टीचा मला अत्यंत अभिमान आहे.”

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिमी सीमाप्रांतातील शांत आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या ‘स्वात’ खोऱ्यातील मिंगोरासारख्या छोट्या गावातील आणि वडील शिक्षक व आई साधी गृहिणी असलेल्या साध्या सामान्य कुटुंबात ‘मलाला’चा जन्म झाला. वडील ‘झियाउद्दीन’ यांनी अफगाण कवियत्री आणि थोर वीरांगना ‘मलालाई मैवंद’ यांच्या नावावरून आपल्या मुलीचं नाव ‘मलाला’ ठेवलं.

‘शिक्षण घेतल्यामुळे तुमच्या विचारांची कक्षा रुंदावते, तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि शिक्षणाच्या गुरुकिल्लीनेच समाजातील अनेक प्रश्नांचे दरवाजे उघडू शकतात’, हे झियाउद्दीन यांना पक्क ठाऊक होतं आणि त्यासाठीच प्रसंगी पदरमोड करून त्यांनी शाळा उभ्या केल्या होत्या.

आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेत स्वयंप्रेरणेनं ‘मलाला’ने बालकांच्या शिक्षणाचं व्रत स्वीकारलं. संपूर्ण जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांनी आणि मुलींनी शिक्षण घेणं किती आवश्यक आहे हे तिला किशोरवयातच समजलं होतं आणि त्यासंदर्भात पालकांचं प्रबोधन करण्यासाठी तिनं कन्या शिक्षणाची मोहीम उघडली. हे तिच्या जीवावर बेतावं इतका मोठा गुन्हा होता का तिचा?

‘मला तालिबानच्या हल्ल्याची शिकार झालेली मुलगी म्हणून न ओळखता, शिक्षणासाठी संघर्ष करणारी मुलगी म्हणून ओळखावं असं मला वाटतं’ ,

असं सांगणाऱ्या, शांततेसाठी ‘नोबेल प्राईज’ मिळवणाऱ्या आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी लढणाऱ्या  ‘मलाला’ची शिक्षणासंबंधीची आस्था लक्षात न घेता अनेकांनी तिला टीकेचे धनी बनवले. आपापल्या स्वार्थानुसार तिला संस्कृतीविरोधी, परदेशांची हस्तक, अमेरिकेची गुप्तहेर, भारतविरोधी अशी अनेक विशेषणं लावत तसेच शिक्षणासंबधीच्या तिच्या विधानांचा विपर्यास करत ‘मीडिया’ने देखील तिच्याविरोधात अपप्रचार केला. आजही, सत्य स्थिती जाणून न घेता तिच्या कार्याला स्वार्थाचं रूप मानणारी तरुण पिढी बघितली की वाईट वाटतं. या तरुणांनी एकदा तरी ‘मलाला’चे विचार स्वतः ऐकून किंवा वाचून त्यानंतर त्यावर आपले मत ठरवण्याची गरज आहे, असं प्रकर्षाने जाणवलं म्हणून हा लेखप्रपंच.

मलालाचे विचार न जाणून घेता, न ऐकता तिच्यावर टीका करणाऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट मध्ये नक्की कळवा.

आणि हा लेख तुमच्या ओळखीतल्या अशा तरुणांपर्यंत नक्की पोहचवा.

खाली पुस्तकाची लिंक देत आहे.

पुस्तक विकत घ्या


  पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

 

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


Related Posts

No Comments

Leave a Reply

Whatsapp करा
1
मदत हवी आहे?
नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
वाचत रहा,
धन्यवाद!