ek purn apurn by Neela Satyanarayan

एक पूर्ण अपूर्ण

मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

निवृत्त IAS ऑफिसर आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचे आज (दि. १६ जुलै २०२० रोजी) निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा लेख.

मध्यंतरी नीला सत्यनारायण यांचं ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर लेखन असलेलं पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात त्यांचा व त्यांच्या डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाचा ‘चैतन्य’चा खडतर प्रवास त्यांनी रेखाटला आहे. एका खंबीर आईच्या अग्निदिव्याची परीक्षा आणि त्या आईच्या आत्मशक्तीच्या जोरावर तिने खोटी ठरवलेली सर्व वैद्यकीय भाकीतं यांचं हृदस्पर्शी वर्णन मनाला चटका लावून जातं.

त्यांना समाजाकडून, डॉक्टरांकडून मिळालेल्या अवहेलनेचे वर्णन आपल्याला आतून हलवून टाकते. आजही समाज, ‘डाऊन सिंड्रोम’ असलेल्या मुलांना मोकळेपणाने स्वीकारत नाही, अनेक शाळांमध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही, त्यांच्या पालकांना धीर किंवा मनोबल देण्याऐवजी कळत नकळत त्यांचे मानसिक खच्चीकरणच जास्त केले जाते. या पुस्तकातून अशा मुलांच्या आई-वडिलांना खूप चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं आणि समाज म्हणून आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो. दया, सहानुभूती या पलीकडे जात अशा मुलांना आणि त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार देत मोकळेपणे स्वीकारणे किती गरजेचं आहे, हे पटतं.

आपल्यापैकी बऱ्याच जणांना नीला सत्यनारायण यांची सनदी अधिकारी हीच एक ओळख जास्त माहीत असेल पण त्यांचं मराठी साहित्यातील योगदान देखील लक्षणीय आहे.

२०१५ मध्ये आलेला ‘बाबांची शाळा’ हा चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या एका कथेवर आधारित आहे. त्या चित्रपटातील ‘माझ्या मना’ हे गाणे देखील त्यांनी लिहिलेले आणि संगीतबद्ध केलेले आहे.

त्या म्हणतात, मी माझ्या कविता आणि पुस्तकांमधून जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होते कारण ते माझ्या अनुभवांचं आणि भावनांचं प्रतिबिंब आहे. त्यांनी मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमधून लिखाण केलं आहे आत्तापर्यंत त्यांचे १० कवितासंग्रह, १७ लघु कथा, कादंबऱ्या व इतर साहित्य प्रकाशित झालेलं आहे.

एक पूर्ण अपूर्ण‘ सोबतच त्यांचं तरुण उद्योजकांचा प्रेरणा देणारं, ‘सत्य कथा’ , प्रशासकीय सेवेतील अनुभवांवर आधारित ‘जाळरेषा‘ ‘टाकीचे घाव‘, ‘रात्र वनव्याची‘, ग्रामपंचायतीतीळ महिलांसाठी मार्गदर्शनपर असलेलं ‘मी क्रांतीज्योती’, वृत्तपत्रातील स्तंभलेखनाचं संकलन असलेलं ‘आयुष्य जगताना’, ‘डेल्टा-१५‘ तसेच आई-बाबांची शाळा, तिढा, ऋण ही पुस्तकं/कादंबऱ्या देखील एक अनमोल ठेवा आहेत.

प्रशासकीय सेवेसोबतच नीला सत्यनारायण यांचं साहित्य, शिक्षण, संगीत या क्षेत्रातील कार्य तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेलं योगदान या एका लेखामध्ये मावणार नक्कीच नाही. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना वंदन आणि भावपुर्ण श्रद्धांजली.

त्यांचं लेखन तुम्ही याआधी वाचलं असेल तर आम्हाला खाली कमेंट्स मध्ये आवर्जून कळवा. आणि हे पुस्तक वाचून तुम्हाला कसं वाटलं हे देखील कळवा.

आशा करतो की त्यांच्या लिखाणातून आपल्यात कळत-नकळत रुजलेले त्यांचे विचार त्यांच्यानंतर सुद्धा तसेच जीवंत राहतील आणि आपल्याला जगण्याच बळ देतील.


पुस्तक विकत घ्या


  पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून मी पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहे त्याची लिंक येथे देत आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य मी वेळो वेळी तुम्हाला सांगत जाईनच.


ashwini survey

अश्विनी सुर्वे

अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!

Facebook Profile

Instagram Profile

 

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


मराठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मित्रांपर्यंत पोहचवा

Related Posts

No Comments

Leave a Reply

Whatsapp करा
1
मदत हवी आहे?
नमस्कार! यशवंतहो.com वर आपलं स्वागत!

विविध पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी 7208-7272-36 हा मोबाईल क्रमांक कृपया सेव्ह करावा.
Whatsapp Broadcaste द्वारे तुम्हाला सर्वात पहिली अपडेट मिळत राहील. त्यासाठी आम्हाला Whatsapp करा.

चांगल्या पुस्तकांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला आनंद होत आहे.
वाचत रहा,
धन्यवाद!