हे पुस्तक MUST MUST MUST READ लिस्ट मध्ये आत्ताच नोंद करून ठेवा. पुस्तक महाग वाटतंय तर ३-४ जणांनी वर्गणी काढा.. पण हे पुस्तक वाचाच!! (मी सिरिअसली बोलतोय..! विनोद निर्मिती अज्जीब्बात नाही!)
मी तुम्हाला इतकी विनवणी (वजा जबरदस्ती) करतोय कारण हे पुस्तक आहेच तेवढ भारी.
आयुष्यात कधीतरी तुम्हाला चाकोरी बाहेर जाऊन काही करू वाटलेलं, पण समाजाच्या किंवा इतर काही मर्यादेमुळे तुम्ही ते केलं नाही, असं ज्यांच्या सोबत झालंय, त्यांनी तर हे वाचाच! मग ते नोकरी सोडून उद्योगधंदा करण असो किंवा उद्योगधंदा सोडून नोकरी करण असो किंवा कोणतं प्रेम प्रकरण वा कधीच शाळेत न जाण्याचा निर्णय असो. हटके विचार करणाऱ्यांना फटके मारणाऱ्या समाजाला आत्मविश्वासाने तोंड देण्याची शिकवण ह्या पुस्तकातून मिळेल (ह्यांची लेखक शाश्वती देखील देतो!).
असं काय आहे ह्या पुस्तकात? ते थोडक्यात खालील प्रमाणे –
सोप्प्या शब्दात सांगायचं तर जसं.. संगीताच्या सूक्ष्म अभ्यासाने माणूस गायन शिकतो किंवा इंग्लिश स्पिकिंग क्लास मध्ये इंग्लिश शिकवतात, तसं विलक्षण (Extraordinary) मन तयार करण्यासाठी कोणत्या नियमांच(गोष्टींचं) पालन करावं, हे ह्या पुस्तकात सांगितलेलं आहे.
सध्याच्या युगातील सर्वात दर्जेदार, सर्जनशील(creative) व्यक्ती प्रमाणे विचार करायला शिकायचंय तर नवीन नियम, नवीन प्रश्न, नवीन मर्यादा, प्रेमाबद्धालच्या तुमच्या व्याख्या, शिक्षण म्हणजे नक्की काय?, काम.. आनंद म्हणजे काय? ह्याचा विचार कसा करता येईल ह्यावर लेखक भाष्य करतात.
The Code of the Extraordinary Mind म्हणजे एक असा प्लान आहे ज्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टीतल्या चुका खाच-खळगे दिसायला लागतात – मग आपण काम कसं करावं, प्रेम, पालकत्व पासून ते एखाद्या दुखापतीतून स्वतःला कसं सावरावं आणि आपल्याला पाहिजे त्या रस्त्याने जाऊन यशस्वी कसं व्हावं ह्याबद्धलचे फंडे समजतात. मग तुम्ही कुठून सुरुवात करता ह्याचं काही देण-घेण नाही. तुमचं आयुष्य extraordinary होणार हे नक्की! ‘दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये’ ह्याचं मवाळ, अत्याधुनिक वर्जन म्हणा हवं तर ह्या पुस्तकाला.
ह्या पुस्तकात समाविष्ट धड्यांची नावं खालील प्रमाणे-
वास्तविकतेला वाकवणे (bend reality), नियमांमधले अनिष्ट नियम ओळखणे(question the brules), तुमच्या संकृतीला थोडे अपडेट करून पुढे जाणे (transcend the culturescape), तुमच्या शोधाला एकदम जवळून बघणे (embrace your quest), मनाला भानावर ठेवण्याचा सराव(practice consciousness engineering), सतत आनंदी राहता येईल अशा शिस्तीत जगण (live in blissipline), आणि (धर्मापेक्षा) माणुसकीला पुढे नेत राहण या विषयांवर संवादरूपी चर्चा तुम्हाला वाचायला मिळेल. (ह्यात लेखकाने २० नव्याने तयार केलेले शब्द आहेत त्यामुळे मला ते पूर्णपणे तुमच्या पर्यंत पोहचवण थोडं अवघड वाटतंय, तुम्ही पुस्तक वाचाल तेव्हा कळेलच एक एक करून.)
वाचून झाल्यावर तुम्ही तुमच्यावरच्या प्रत्येक मर्यादेला प्रश्नार्थक नजरेने बघायला शिकाल, आणि तुम्हाला जाणवेल कि आपल्यावर कोणत्याच मर्यादा नाहीत 🙂 . तुम्हाला समजेल कि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनुसार ह्या गोष्टी बदलत जातात. शेवटी तुम्हाला एक अशी extraordinary लेवल समजेल ज्यातून तुम्ही सदैव (हो शब्दशः सदैव) आनंदी राहायला शिकाल. कारण हा Extraordinary मनाचा CODE वापरून तुम्ही तुमचं नशीब (LUCK) बनवायला शिकलेला असाल!
एक अडचण – हे पुस्तक अजून मराठीत उपलब्ध नाही. पण ह्यातलं इंग्रजी तितकंसं अवघड नाही. सो.. समजायला जास्त त्रास होणार नाही. माझा वाचक वर्ग मराठी आहे हे माहित असून सुद्धा मी ह्या बद्धल लिहितोय कारण ह्याची मराठी आवृत्ती येईपर्यंत वाट बघत बसण्यात अर्थ नाही. मी तर म्हणीन हे पुस्तक वाचता यावं म्हणून इंग्रजी शिकलात तरी हरकत नाही!
लेखकाने ह्यात लिहिलेला Extraordinary मनाचा CODE हा त्यांच्या अनुभवातून आणि त्यांनी वाचलेल्या १२ वेगवेगळ्या पुस्तकातून तयार केला आहे. शालेय अभ्यासक्रमात जसं ‘नवनीत गाईड’ होतं, तसं ह्या पुस्तकाला तुम्ही म्हणू शकता. आणि विषय अजून खोलात जाऊन वाचण्याची इच्छा आणि वेळ असेल तर हि १२ पुस्तकं पूर्ण वाचायला हरकत नाही. यशवंत हो – MUST READ मध्ये आपण ती सर्व पुस्तकं वाचून काढणार आहोतच.
पुस्तकाच्या इंग्रजी आवृत्तीसाठी इथे क्लिक करा .
“Just as a programmer can program a computer to do specific tasks by understanding its code, you can program your life and the world around you to improve, enhance the way you live and the experiences you have in this lifetime. But first, you have to see this code. And that’s where this book comes in.”
– Vishen Lakhiani, The Code of the Extraordinary Mind
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
यशवंत दिडवाघ
पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.
Leave a Reply