Tag: yethe kavita
-
सावित्री मी
सावित्री मी अहिल्या मी जीती जागती मलाला मी, झाशी मधली खाकी मधली गगन भरारी कल्पना मी.. पंख जरासे पसरु दया, उडू दया, मला जगू दया.. कुणी येईल समोर त्याला प्रेमळ तितकिच कठोर मी, सरस्वतीच्या रूपामधली महिशासुर मर्दिनीही मी.. सावित्री मी.. निपक्षपाती आई बनते अंगाईतली गाणी म्हणते, तुझीच सीता पतिव्रता मी वेळ प्रसंगी दुर्गा बनते.. सावित्री…