Tag: vadil

  • तिच्यासाठी वडापाव

    तिच्यासाठी वडापाव

    वडापाव. घरात सगळ्यांचा फेव्हरेट. तसं, पोरांना नाही एवढं कौतुक, पण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा. मुंबईत शिकायला आलो, तेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या. लहानपणीसुद्धा. दर बुधवारी वाट बघायचो. आई आठवड्याच्या बाजाराला जायची. घेवडा, उडीद, लसूण विकायला. तेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला. येताना हमखास वडापाव आणायची. लिंबाएवढा. पेपरात गुंडाळलेला. 2 रुपयाचा. प्रत्येकाला एक. चार भावंड. आमचं…