Tag: stri atyachar
-
१० आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!
आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची…
-
दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही
“चूक तुझी नाहीये, गोपाळा -” मी जरा सौम्यपणे म्हटलं. “चूक तुझ्या नस्त्या वेडगळ नीतिकल्पनांची आहे त्या कल्पनांनी तू स्वतःला जखडून घेतलयस, म्हणून हातपाय हलवू शकत नाहीयेस! मुलगी आपली आहे! तिचा छळ होता, सासरी पटत नाही, तर मग तिला घरी परत आणली पुढं तिची काही प्रगती होईल, असं पाहिलं- हे सगळ शहाणपणाला धरून आहे की नाही?…