Tag: Purushottam Laxman Deshpande
-
पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!
पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय? नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे. साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन…
-
ती फुलराणी
पुलंच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा किंवा पुस्तकाचा विषय निघाला, आणि तुम्ही ते नाटक पाहिलं असेल-नसेल, पुस्तक वाचलं असेल-नसेल तरी मंजुळेचं पुढील स्वगत तुम्ही एकदातरी नक्कीच ऐकलं असेल. ‘असं काय मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी? थांब…. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा! मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर तुजं…