Tag: marathi pustak olakh

  • मी… वगैरे – वैभव जोशी – पुस्तक ओळख

    मी… वगैरे – वैभव जोशी – पुस्तक ओळख

    कुठूनही तरंगत येतं एक नातं आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं… तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी आलाय का हो गंध… काही उमलण्याही आधी? कसलं जबरदस्त लिहिलंय हे! कित्ती साधे सोप्पे शब्द पण ते मांडलेतच इतक्या तीव्रतेने की सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतात. खरंच! इतकं सुंदर लिहितो वैभव जोशी दादा. (एकेरी नावाने उल्लेख करतेय,…

  • ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही. मला आवडलेला ‘झेल्या’ बघा. ‘बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट…

  • रानमित्र – माणसाला प्राण्यांची खरी ओळख करून देणारा

    रानमित्र – माणसाला प्राण्यांची खरी ओळख करून देणारा

    हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पासोबतच तेथील वन्य प्राण्यांच्या अनाथालयाबद्दल किंवा प्रकाश आमटेंच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या ‘प्राण्यांच्या गोकुळा’बद्दल सर्वांनाच फार कुतूहल वाटतं. अस्वल, वाघ, सिंह, बिबटे, साप अशा प्राण्यांसोबत खेळीमेळीने कसं कोण राहू शकत, भीती नाही वाटत का असे बरेच प्रश्न या वातावरणापासून दूर असणाऱ्यांना पडणं साहजिक आहे. प्रकाश आमटे सर ‘रानमित्र’ या पुस्तकात सांगतात की, ‘शहरात…

  • सरल तरल

    सरल तरल

    हे पुस्तक वाचण्याची एकच अट आहे. – ती म्हणजे वास्तवाने जखडलेले मन मोकळं करायचं, असं कधी असतं का? हा विचार जरावेळ बाजूला ठेवायचा आणि मग वाचायला घ्यायचं. एखादा डांबरी रस्ता हा मुळात एखादी कच्ची मातीची  पायवाट असतो. आता विचार करा की, एखादी मळकी, कच्ची, धुळीनं भरलेली मातीची पायवाट ही आत्ताच्या एखाद्या नवीन डांबरी रस्त्याची आई…

  • ती फुलराणी

    ती फुलराणी

    पुलंच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा किंवा पुस्तकाचा विषय निघाला, आणि तुम्ही ते नाटक पाहिलं असेल-नसेल, पुस्तक वाचलं असेल-नसेल तरी मंजुळेचं पुढील स्वगत तुम्ही एकदातरी नक्कीच ऐकलं असेल.   ‘असं काय मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी? थांब…. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा! मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर तुजं…

  • प्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’

    प्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’

    ‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक इतकं प्रेरणादायी का वाटतं, याबद्दल उत्तर देताना एकदा ‘वीणा गवाणकर’ मॅडम बोलल्या होत्या की, “आपल्याला धाडस आवडतं. मला मुलांना हेच सांगायचं होतं, की धाडस किती प्रकारचं असतं? केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे फक्त धाडस नाही. धाडस, परिस्थितीवर मात करणं असतं. आपण जो एक निर्णय घेतलाय, त्यावर…

  • वाईज अँड अदरवाईज

    वाईज अँड अदरवाईज

    सुधा मूर्तींनी, एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की माझी पुस्तकं वाचताना, लोकांना डिक्शनरी घेऊन बसावं लागू नये असं मला वाटतं; मग ते जिथे कुठे असतील तिथे त्यांना माझे अनुभव आरामात वाचता यायला हवेत. आणि तेव्हा मला जाणवलं की खरंच, जेव्हा मी इंग्रजी पुस्तकांकडे वळले तेव्हा सुधा मूर्तींच्या सोप्प्या, सुंदर आणि ओघवत्या लिखाणशैली मुळेच त्यांच्या पुस्तकांनी मला…

  • वपु काळे-कथाकथनाची कथा

    वपु काळे-कथाकथनाची कथा

    कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक. प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा.. कॉलेज मध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी…