Tag: marathi kavita

  • ‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना

    ‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना

    चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या…

  • सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!

    सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!

    भांडी इकू नगस राहू नगस उपाशी अनवाणी चालू नगस लुगड्याला ठिगळ लावू नगस असं म्हणायचास लहानपणी अन मंग आता शाली, नारळ, स्मृतिचिन्ह जी येतात घरात पेपरात असतो, टिव्हीत दिसतो कधीमधी मला सांग शिक्षण जर घेतलं नसतं तर… हे झालं असतं का रे? अडाणी कुठला कवी देवा झिंजाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या पुस्तकातील ही…

  • मी… वगैरे – वैभव जोशी – पुस्तक ओळख

    मी… वगैरे – वैभव जोशी – पुस्तक ओळख

    कुठूनही तरंगत येतं एक नातं आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं… तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी आलाय का हो गंध… काही उमलण्याही आधी? कसलं जबरदस्त लिहिलंय हे! कित्ती साधे सोप्पे शब्द पण ते मांडलेतच इतक्या तीव्रतेने की सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतात. खरंच! इतकं सुंदर लिहितो वैभव जोशी दादा. (एकेरी नावाने उल्लेख करतेय,…

  • बिझी चिऊ ताई

    बिझी चिऊ ताई

    . नव्याने ऑफिसला जात असलेल्या चिऊताईची कहाणी . बाकी- चिऊताई चिऊताई, व्हॉट्सऍप उघड. चिऊताई- थांब मला थोडावेळ झोपुदे. . बाकी- चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड. चिऊताई- थांब माझं ऑफिसमधल काम होउदे. . बाकी- चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड. चिऊताई- थांब मला ट्रेनच्या गर्दीमधला प्रवास संपवू दे. . बाकी – चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड. चिऊताई – थांब मला…

  • कुणाचं ऐकायचं?

    कुणाचं ऐकायचं?

    . आई सांगते, नेहमी दुसऱ्यांना समजून घ्यायच. सासूआई सांगते, स्वतःला त्रास करून दुसऱ्याचं मन नाही रमवायचं. सांगा आता कुणाचं ऐकायचं? . वडील सांगतात, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. सासरे सांगतात, वडीलधाऱ्यांचा मदतीचा हात कायम सोबत ठेवायचा. सांगा आता कुणाचं ऐकायचं? . भाऊ सांगतो, रिझल्टला महत्व आहे, तयारी तुमच्या पद्धतीने कशीही करा. दीर सांगतो, साधनेला महत्व आहे.…

  • रंग

    रंग

    चेहेऱ्यात अडकला जीव येते की रे कीव मला वेड्यांची, झाले परि आंधळे त्यांना जी न कळे कला जगण्याची, राहशील किती तू व्यस्त करी उध्वस्त जगणे स्वतःचे, समज नाही बुद्धीची अंती वृद्धीची गणितं प्रगतीचे, घालवी सर्व आयुष्य समजुनी तुच्छ जे दिसे काळे, बगळा असो वा कावळा दोन्ही आकाशी उंच उडती रे, दोन्हीची वेगळी भूक वेगळी रीत…