Tag: marathi katha

  • भावासारखा मित्र

    भावासारखा मित्र

    ‘आज पण चार चपात्या! चंदूअण्णा, तुम्हाला नको बोललो ना! मी बनवतो की काहीतरी! कशाला उगाच वैनीला त्रास!’ ‘आरं, गप की बाबा! कसला तरास त्यात! ते काय जास्त हाय व्हय! चार चपात्या अन इतकुशी भाजी. तिला काय जड नाय जात!’ ‘आव्हो पण…’ ‘आरं बाबा, तिला नाय कसला तरास! ती सोताच मनापासनं दिती डबा. खा आता पटदिशी.…

  • तिच्यासाठी वडापाव

    तिच्यासाठी वडापाव

    वडापाव. घरात सगळ्यांचा फेव्हरेट. तसं, पोरांना नाही एवढं कौतुक, पण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा. मुंबईत शिकायला आलो, तेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या. लहानपणीसुद्धा. दर बुधवारी वाट बघायचो. आई आठवड्याच्या बाजाराला जायची. घेवडा, उडीद, लसूण विकायला. तेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला. येताना हमखास वडापाव आणायची. लिंबाएवढा. पेपरात गुंडाळलेला. 2 रुपयाचा. प्रत्येकाला एक. चार भावंड. आमचं…

  • समस्या

    समस्या

    त्याला बघताच तिच्या कपाळावर आठ्या उमटायच्या. रोज कामावर आली, की पहिलं दर्शन त्याचंच व्हायचं. कधी कधी राणी सोबत असली, की कुजकट हसून तिला चिडवायची पण, “बघ, त्याने तुझ्यासाठी फुलांचा गालिचा अंथरलाय.” ते बघून तर तिचा पारा अजूनच चढायचा. त्यामुळेच तर तिचं काम अजून वाढत होतं. हे असं कधीपासून सुरू होतं ते तिला आठवतही नव्हतं; कदाचित…