Tag: marathi book blog
-
यूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं
UPSC यूपीएससी च्या विद्यार्थ्यांचा पुस्तकं कुठे मिळतील हे शोधण्यात जाणारा वेळ थोडातरी कमी व्हावा या हेतूने यूपीएससीच्या ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकं जिथून घेता येतील अशा ऑनलाइन वेबसाईट्स व प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांसोबत संपर्क करण्यासाठी माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. UPSC मराठी साहित्य वैकल्पिक विषय(Main Exam) संदर्भ पुस्तिका पुढीलप्रमाणे –…
-
काय वाचावं? कसं वाचावं? विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन
नवोदित वाचकांना पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्की काय वाचायला हवं? कारण जर सुरुवातीलाच योग्य पुस्तक वाचनात नाही आलं तर स्वतःला वाचन आवडत नाही किंवा पुस्तकंच बोरिंग असतात असा गैरसमज होतो. कोणी ‘काय वाचू’ विचारल्यावर, “वाचत रहा! तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल ते वाचा आणि मग तुम्हाला काय वाचायला आवडतं हे ठरवा” हे विधान एका अर्थी बरोबर…
-
ठाम निर्णय कसे घ्यायचे?
आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते. मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण…
-
रत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी
‘रत्नाकर मतकरीं’च्या वैविध्यपूर्ण साहित्य योगदानात त्यांनी बालरंगभूमीसाठी केलेले कार्य विशेष दखल घेण्याजोगे आहे. महाराष्ट्रात मतकरींनी बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वतः पदरमोड करून सुमारे तीस वर्षे बालनाट्यांची निर्मिती केली. बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच त्यांच्यावर मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातीलच एक आहे, ‘वंचितांचा रंगमंच’. या प्रकल्पातून त्यांनी अनाथ तसेच गरीब घरातल्या मुलांना नाटकाचं…
-
मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते
रहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतून गेलेलो असतो. पुढे काय? पुढे काय होणार? ही उत्सुकता कायम मनावर असते, अशावेळी जर लेखकाने आपल्याला अशा एखाद्या वळणावर आणून सोडलं की जिथून आत्ता तुम्हालाच शोध पूर्ण करायचा आहे तर? मग पुढचे चार-पाच दिवस किंवा त्याहूनही जास्त ते कोडं सोडवण्यातच किंवा फक्त त्याचा विचार करण्यातच जातात. हृषीकेश…
-
संदीप खरे – मी अन् माझा आवाज
दादरचं रवींद्र नाट्यमंदिर. ‘संदीप खरे’ आणि ‘वैभव जोशीं’चा, ‘इर्षाद’ हा कार्यक्रम भन्नाट रंगलेला. टाळ्यांच्या गजरात, हास्याच्या गडगडाटात, दिलखुलास दाद देत प्रेक्षक अगदी भावमग्न झालेले आणि संदीप खरेंनी त्यांच्या एका ‘जिवलग’ मित्राबद्दल सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी ‘जिवलग’ होतो दोघे… मी अन् माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो… तो दुसऱ्या…
-
दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व
दुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे,…