Tag: book summary

  • लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

    लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं

    मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात स्वप्नील जोशीचा एक डायलॉग आहे की, ‘आजकाल नाती का तुटतात माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो.’ फार अर्थपूर्ण आहे हे वक्तव्य. लव्हमॅरेज करताना आपल्याला वाटतं, की आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो पण बऱ्याच वेळा काही प्रमाणात तो फक्त एक मुखवटा असतो. एक हुरहूर असते, की…

  • द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

    द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

    तुम्हाला माहितीये, एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचं प्रमाण आजकाल वाढतंय! आकडेवारी बघितली तर गेल्या २० महिन्यांत पती-पत्नीपैकी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याचा तुलनेत ९० टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत(संदर्भ- वृत्तपत्रं). २ वर्षांपूर्वी एका लीगल फर्म मध्ये प्रॅक्टिस करताना आमच्याकडे बहुतेककरून डिव्होर्सच्या केसेस यायच्या. त्यातही संमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण बरंच जास्त…

  • कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य

    कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य

      विद्या बालनच्या ‘शकुंतलादेवी’ सिनेमामध्ये शकुंतलादेवी जेव्हा पहिल्यांदा लंडनला जातात तेव्हा त्या तेथील एका गेस्ट-हाऊस/लॉजिंग-बोर्डिंग मध्ये काही दिवस राहिलेल्या दाखवलंय. त्या बोर्डिंगच्या मालक एक नऊवारी नेसलेल्या मध्यमवयीन महाराष्ट्रीय महिला आहेत, हे बघून मला खुप आश्चर्य वाटलेलं. म्हणजे लंडनसारख्या शहरात इतक्या जुन्या काळात एका मराठी महिलेच्या मालकीचं लॉजिंग-बोर्डिंग असणं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे ना! एका दृश्यात नऊवारीवर…

  • रानमित्र – माणसाला प्राण्यांची खरी ओळख करून देणारा

    रानमित्र – माणसाला प्राण्यांची खरी ओळख करून देणारा

    हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पासोबतच तेथील वन्य प्राण्यांच्या अनाथालयाबद्दल किंवा प्रकाश आमटेंच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या ‘प्राण्यांच्या गोकुळा’बद्दल सर्वांनाच फार कुतूहल वाटतं. अस्वल, वाघ, सिंह, बिबटे, साप अशा प्राण्यांसोबत खेळीमेळीने कसं कोण राहू शकत, भीती नाही वाटत का असे बरेच प्रश्न या वातावरणापासून दूर असणाऱ्यांना पडणं साहजिक आहे. प्रकाश आमटे सर ‘रानमित्र’ या पुस्तकात सांगतात की, ‘शहरात…