Tag: aai

  • मॅक्झिम गोर्की – आई

    मॅक्झिम गोर्की – आई

    ती उंच होती. थोडीशी पाठीत वाकली होती. आयुष्यभराच्या काबाडकष्टांमुळं आणि नवऱ्याच्या हातचा मार खाण्यामुळं तिचं शरीर जीर्ण झालं होतं. घरात ती आवाज न करता चालायची, धक्का लागून काही पडू नये म्हणून एका बाजूला अंग चोरून चालायची. तिच्या सुरकुत्या पडलेल्या रुंद आणि अंडाकृती चेहऱ्यावर थोडीशी सूज होती, उजव्या भुवईवर एक खोल व्रण होता आणि तिच्या काळ्याभोर…

  • तिच्यासाठी वडापाव

    तिच्यासाठी वडापाव

    वडापाव. घरात सगळ्यांचा फेव्हरेट. तसं, पोरांना नाही एवढं कौतुक, पण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा. मुंबईत शिकायला आलो, तेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या. लहानपणीसुद्धा. दर बुधवारी वाट बघायचो. आई आठवड्याच्या बाजाराला जायची. घेवडा, उडीद, लसूण विकायला. तेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला. येताना हमखास वडापाव आणायची. लिंबाएवढा. पेपरात गुंडाळलेला. 2 रुपयाचा. प्रत्येकाला एक. चार भावंड. आमचं…