Tag: मराठी ब्लॉग

  • प्राजक्तप्रभा – मनस्वी कलाकाराची अभिव्यक्ती

    प्राजक्तप्रभा – मनस्वी कलाकाराची अभिव्यक्ती

    ‘प्राजक्ता माळी’चा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह अनपेक्षित धक्का होता पण पुस्तक हातात आल्यावर आणि वाचल्यावर तो सुखद आहे, हे ठामपणे सांगता येतं. ‘अभिनेत्री, निवेदिका, शास्त्रीय नृत्यांगना आणि लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्य भरभरून जगणारी व्यक्ती’ म्हणून नव्याने भेटलेली प्राजक्ता माळी’, या तिच्या सर्व ओळखी या कवितांमधून अगदी मोकळेपणाने भेटतात आणि मनाला भिडतातही. पुस्तकातल्या कित्येक कविता वाचताना…

  • सोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा

    सोशल मिडियासाठी कॉपीराईट कायदा

    स्वामित्व हक्क म्हणजे काय? कॉपीराईट कायदा काय सांगतो? लेखक, कवी, गीतकार, चित्रकार, संगीतकार यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून केलेल्या कलेच्या निर्मितीवर त्यांचा काही काळापुरता ‘बौद्धिक संपदा हक्क’ किंवा ‘स्वामित्व हक्क’ म्हणजेच ‘कॉपीराईट’ असतो. यात निर्मात्याच्या परवानगी शिवाय त्या रचनेचा किंवा निर्मितीचा इतर कोणीही कोणत्याही प्रकारे वापर करू शकत नाही. लेख, कथा, स्क्रिप्ट, कविता, गीत, गाणी,…

  • मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह

    मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह

    मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान देखील गळताना तन्मयतेने पाहणारा एके काळी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांनी तरुणांना भारावून टाकलं होतं. त्यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह तर इतका लोकप्रिय झाला की, अनेकांच्या घरी तर तो असायचाच पण काही मोठ्या रिसॉर्टमध्येही त्या संग्रहातील चारोळ्यांचे मोठे बॅनर, फलक लावलेले पाहायला मिळायचे. ‘मी माझा’च्या तर ६…

  • बाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके

    बाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके

    जेष्ठ नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, कवी-गीतकार आणि अभिनेते असलेल्या ‘बाळ कोल्हटकर’जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, मृत्यू : ३० जून १९९४) यांचा आज स्मृतीदिन. सातवी पर्यंतच शिक्षण झालेल्या बाळकृष्ण हरी कोल्हटकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच ‘जोहार’ हे नाटक लिहिले होते. लहानपणापासून ते लेखन करत असले तरी त्यांची प्रतिभा नाट्यगीतं व नाटकांमधूनच बहरली. कुटुंबप्रधान कथानक, काळजाला भिडणारी गीते…

  • फ्लाइंग सिख – द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र

    फ्लाइंग सिख – द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र

    काहींच्या मनात मिल्खा सिंग हे नाव ऐकताच इतिहासाच्या पुस्तकातील एखादी धूसर स्मृती चाळवली जाते, पण बहुतेक लोक त्यांना अजूनही ओळखतात ते त्यांना मिळालेल्या ‘उडणारा शिख’ या त्यांच्या टोपणनावानंच. चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीतील सर्वोत्तम खेळाडू अशी कीर्ती प्राप्त केलेल्या मिल्खा सिंगांवर त्यांच्या आयुष्यातील अंतिम ठरलेल्या शर्यतीत १९६० सालच्या रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हार पत्करण्याची नामुष्की ओढवली. हे…

  • कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    काही वर्षांपूर्वी, ‘सेकंड हॅन्ड’ नावाची, दोन भावांची एक कथा वाचलेली. त्यांचे वडील कुठल्या तरी कापड दुकानात दिवाणजी होते. तशी परिस्थिती बेताचीच होती. पण दोघं मुलं छान शिकली. त्यातला मोठा भाऊ खूप हुशार, पहिला नंबरवाला होता. छोटा तसा हुशारच पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला. छोटा भाऊ मेहनती होता, पण फार महत्वाकांक्षी नव्हता. त्याचा टारगेट ठेवून पुढं जायचा…

  • ठाम निर्णय कसे घ्यायचे?

    ठाम निर्णय कसे घ्यायचे?

      आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते. मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण…

  • कमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत?

    कमी बजेटमध्ये जास्त पुस्तकं कशी वाचावीत?

    कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं कशी वाचता येतील असा प्रश्न किंवा विचार अनेकांच्या मनात येतो. अशा वाचनप्रेमींसाठी ही माहिती. सेकंड-हॅन्ड पुस्तकं – असा विचार करा की, एखादं पुस्तक त्याच्या वाचकापेक्षा जास्त काळ जगतं. त्यामुळे एका वाचकाकडून दुसऱ्या वाचकाकडे कधीनाकधी जाण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. त्यामुळे या पुस्तकांकडे फक्त जुनी पुस्तकं म्हणून पाहू नका. – तुमच्या भागातील…

  • मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

    मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते

    रहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतून गेलेलो असतो.  पुढे काय? पुढे काय होणार? ही उत्सुकता कायम मनावर असते, अशावेळी जर लेखकाने आपल्याला अशा एखाद्या वळणावर आणून सोडलं की जिथून आत्ता तुम्हालाच शोध पूर्ण करायचा आहे तर? मग पुढचे चार-पाच दिवस किंवा त्याहूनही जास्त ते कोडं सोडवण्यातच किंवा फक्त त्याचा विचार करण्यातच जातात. हृषीकेश…

  • संदीप खरे – मी अन् माझा आवाज

    संदीप खरे – मी अन् माझा आवाज

      दादरचं रवींद्र नाट्यमंदिर. ‘संदीप खरे’ आणि ‘वैभव जोशीं’चा, ‘इर्षाद’ हा कार्यक्रम भन्नाट रंगलेला. टाळ्यांच्या गजरात, हास्याच्या गडगडाटात, दिलखुलास दाद देत प्रेक्षक अगदी भावमग्न झालेले आणि संदीप खरेंनी त्यांच्या एका ‘जिवलग’ मित्राबद्दल सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी ‘जिवलग’ होतो दोघे… मी अन् माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो… तो दुसऱ्या…