Tag: मराठी बुक ब्लॉग

  • मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह

    मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह

    मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान देखील गळताना तन्मयतेने पाहणारा एके काळी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांनी तरुणांना भारावून टाकलं होतं. त्यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह तर इतका लोकप्रिय झाला की, अनेकांच्या घरी तर तो असायचाच पण काही मोठ्या रिसॉर्टमध्येही त्या संग्रहातील चारोळ्यांचे मोठे बॅनर, फलक लावलेले पाहायला मिळायचे. ‘मी माझा’च्या तर ६…

  • मराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील

    मराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील

    “मी जर केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले तर, ते पन्नास वर्षांचे होईल, संभाजी महाराज लिहिले तर ३२ वर्षांचे होईल, राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले तर त्यांचा कार्यकाळ हा ११ वर्षांचा आहे. परंतु ह्या सगळ्यांचा कार्यकाळ बघणारा औरंगजेब सगळ्यांच्या चरित्रांचे चित्रण करण्यासाठी मला सोपा वाटला, म्हणून लिखाणासाठी हे पात्र निवडावंसं वाटलं. बाकी चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी,…

  • प्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा

    प्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा

    ज्यांच्या ओघवत्या व ओजस्वी वकृत्वाने अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले, ज्यांना वक्ता दशसहस्त्रेषु म्हंटले गेले, ज्यांनी ५ दशकाहून अधिक काळ आपल्या व्याख्यानमालेतून जनजागृती केली असे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आज स्मृतीदिन. प्रा.शिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ – जून २९, २०१०) यांची लेखक, उत्कृष्ट वक्ते यासोबतच विद्यार्थीप्रिय प्राचार्य ही एक महत्वाची ओळख. फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये ते सुमारे २५…

  • फ्लाइंग सिख – द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र

    फ्लाइंग सिख – द रेस ऑफ माय लाईफ – मिल्खा सिंग यांचे आत्मचरित्र

    काहींच्या मनात मिल्खा सिंग हे नाव ऐकताच इतिहासाच्या पुस्तकातील एखादी धूसर स्मृती चाळवली जाते, पण बहुतेक लोक त्यांना अजूनही ओळखतात ते त्यांना मिळालेल्या ‘उडणारा शिख’ या त्यांच्या टोपणनावानंच. चारशे मीटर धावण्याच्या शर्यतीतील सर्वोत्तम खेळाडू अशी कीर्ती प्राप्त केलेल्या मिल्खा सिंगांवर त्यांच्या आयुष्यातील अंतिम ठरलेल्या शर्यतीत १९६० सालच्या रोममध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये हार पत्करण्याची नामुष्की ओढवली. हे…

  • काय वाचावं? कसं वाचावं? विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन

    काय वाचावं? कसं वाचावं? विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन

    नवोदित वाचकांना पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्की काय वाचायला हवं? कारण जर सुरुवातीलाच योग्य पुस्तक वाचनात नाही आलं तर स्वतःला वाचन आवडत नाही किंवा पुस्तकंच बोरिंग असतात असा गैरसमज होतो. कोणी ‘काय वाचू’ विचारल्यावर, “वाचत रहा! तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल ते वाचा आणि मग तुम्हाला काय वाचायला आवडतं हे ठरवा” हे विधान एका अर्थी बरोबर…

  • कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    कथुली – म्हणजे कथेचं पिल्लू – मोठा डोस देणाऱ्या छोट्या कथा

    काही वर्षांपूर्वी, ‘सेकंड हॅन्ड’ नावाची, दोन भावांची एक कथा वाचलेली. त्यांचे वडील कुठल्या तरी कापड दुकानात दिवाणजी होते. तशी परिस्थिती बेताचीच होती. पण दोघं मुलं छान शिकली. त्यातला मोठा भाऊ खूप हुशार, पहिला नंबरवाला होता. छोटा तसा हुशारच पण मोठ्याच्या सावलीत झाकोळलेला. छोटा भाऊ मेहनती होता, पण फार महत्वाकांक्षी नव्हता. त्याचा टारगेट ठेवून पुढं जायचा…

  • दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व

    दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व

    दुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे,…

  • बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी

    बाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. बाबा कदम हे वकील होते आणि पोलिसांसोबत काम करत होते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांना अशा अनेक केसेस व घटनांना सामोरं जावं लागायचं ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिसायचे. या केसेस मधून मिळालेले अनुभव बाबा कदमांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केले आणि…