Tag: मराठी पुस्तक
-
पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!
पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय? नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे. साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन…
-
दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही
“चूक तुझी नाहीये, गोपाळा -” मी जरा सौम्यपणे म्हटलं. “चूक तुझ्या नस्त्या वेडगळ नीतिकल्पनांची आहे त्या कल्पनांनी तू स्वतःला जखडून घेतलयस, म्हणून हातपाय हलवू शकत नाहीयेस! मुलगी आपली आहे! तिचा छळ होता, सासरी पटत नाही, तर मग तिला घरी परत आणली पुढं तिची काही प्रगती होईल, असं पाहिलं- हे सगळ शहाणपणाला धरून आहे की नाही?…
-
द प्रॉफेट – आयुष्याची वाट सोपी करण्यासाठी
माणूस जीवनाचा शोध घेण्यासाठी सतत धडपडत असतो. परंतु त्याला माहीत नसतं, की ज्या जीवनाचा तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो ते जीवन त्याच्यातच असते. – खलील जिब्रान, द प्रॉफेट. खलील जिब्रान या जगप्रसिद्ध लेबनॉनी-अमेरिकन लेखक आणि कवीचे ‘द प्रॉफेट’ हे एक छोटंसं पण आयुष्याचं तत्वज्ञान तरल काव्यात्मक रुपात मांडणार अतिशय सुंदर पुस्तक. या पुस्तकाचं जगभरात २०…
-
ती फुलराणी
पुलंच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा किंवा पुस्तकाचा विषय निघाला, आणि तुम्ही ते नाटक पाहिलं असेल-नसेल, पुस्तक वाचलं असेल-नसेल तरी मंजुळेचं पुढील स्वगत तुम्ही एकदातरी नक्कीच ऐकलं असेल. ‘असं काय मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी? थांब…. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा! मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर तुजं…
-
आपण सारे अर्जुन
‘मालकी हक्काची भावना हीच हिंसा आहे. आपण आपल्यालाच एक तिऱ्हाईत व्यक्ती म्हणून अंतरावरून, उंचावरून पाहू शकलो असतो, स्वतःचा स्वभावही बदलू शकलो असतो तर? खरंच ही शक्ती माणसाला लाभली असती, तर आयुष्यभर दुसऱ्या माणसात बदल घडवून आणण्याच्या खटाटोपात जिवाचं रान करण्याऐवजी त्यानं स्वतःत बदल घडवून आयुष्याचा बगीचा केला असता.’ काय लिहितात वपु! एकेक ओळ वाचताना या…