Tag: मराठी पुस्तक
-
सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता
पुस्तकं का वाचली जात नाही, याबद्दल आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या होत्या. वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल आमचे अभिप्राय आम्ही ह्या ब्लॉग वर पोस्ट करतोय. ह्या मागचा ‘पवित्र’ हेतू हा कि आमच्या परिचयातील आणि सर्वच स्तरातील लोकांनी पुस्तकं वाचण्यास जोमाने सुरुवात करावी. ह्या उपक्रमानंतर काही अंशी माझ्या मित्रांनी पुस्तकं वाचून काढली देखील तर काहींची अर्ध्यात आहेत. काही ‘मी वाचायला…
-
प्राजक्तप्रभा – मनस्वी कलाकाराची अभिव्यक्ती
‘प्राजक्ता माळी’चा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह अनपेक्षित धक्का होता पण पुस्तक हातात आल्यावर आणि वाचल्यावर तो सुखद आहे, हे ठामपणे सांगता येतं. ‘अभिनेत्री, निवेदिका, शास्त्रीय नृत्यांगना आणि लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्य भरभरून जगणारी व्यक्ती’ म्हणून नव्याने भेटलेली प्राजक्ता माळी’, या तिच्या सर्व ओळखी या कवितांमधून अगदी मोकळेपणाने भेटतात आणि मनाला भिडतातही. पुस्तकातल्या कित्येक कविता वाचताना…
-
मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह
मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान देखील गळताना तन्मयतेने पाहणारा एके काळी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांनी तरुणांना भारावून टाकलं होतं. त्यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह तर इतका लोकप्रिय झाला की, अनेकांच्या घरी तर तो असायचाच पण काही मोठ्या रिसॉर्टमध्येही त्या संग्रहातील चारोळ्यांचे मोठे बॅनर, फलक लावलेले पाहायला मिळायचे. ‘मी माझा’च्या तर ६…
-
बाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके
जेष्ठ नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, कवी-गीतकार आणि अभिनेते असलेल्या ‘बाळ कोल्हटकर’जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, मृत्यू : ३० जून १९९४) यांचा आज स्मृतीदिन. सातवी पर्यंतच शिक्षण झालेल्या बाळकृष्ण हरी कोल्हटकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच ‘जोहार’ हे नाटक लिहिले होते. लहानपणापासून ते लेखन करत असले तरी त्यांची प्रतिभा नाट्यगीतं व नाटकांमधूनच बहरली. कुटुंबप्रधान कथानक, काळजाला भिडणारी गीते…
-
प्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा
ज्यांच्या ओघवत्या व ओजस्वी वकृत्वाने अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले, ज्यांना वक्ता दशसहस्त्रेषु म्हंटले गेले, ज्यांनी ५ दशकाहून अधिक काळ आपल्या व्याख्यानमालेतून जनजागृती केली असे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आज स्मृतीदिन. प्रा.शिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ – जून २९, २०१०) यांची लेखक, उत्कृष्ट वक्ते यासोबतच विद्यार्थीप्रिय प्राचार्य ही एक महत्वाची ओळख. फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये ते सुमारे २५…
-
यूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं
UPSC यूपीएससी च्या विद्यार्थ्यांचा पुस्तकं कुठे मिळतील हे शोधण्यात जाणारा वेळ थोडातरी कमी व्हावा या हेतूने यूपीएससीच्या ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकं जिथून घेता येतील अशा ऑनलाइन वेबसाईट्स व प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांसोबत संपर्क करण्यासाठी माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. UPSC मराठी साहित्य वैकल्पिक विषय(Main Exam) संदर्भ पुस्तिका पुढीलप्रमाणे –…
-
काय वाचावं? कसं वाचावं? विद्यार्थी आणि नवोदित वाचकांसाठी मार्गदर्शन
नवोदित वाचकांना पडणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे नक्की काय वाचायला हवं? कारण जर सुरुवातीलाच योग्य पुस्तक वाचनात नाही आलं तर स्वतःला वाचन आवडत नाही किंवा पुस्तकंच बोरिंग असतात असा गैरसमज होतो. कोणी ‘काय वाचू’ विचारल्यावर, “वाचत रहा! तुम्हाला जे सहज उपलब्ध होईल ते वाचा आणि मग तुम्हाला काय वाचायला आवडतं हे ठरवा” हे विधान एका अर्थी बरोबर…