Tag: मराठी नाटक
-
बाळ कोल्हटकर – गाजलेली नाटके
जेष्ठ नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, कवी-गीतकार आणि अभिनेते असलेल्या ‘बाळ कोल्हटकर’जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, मृत्यू : ३० जून १९९४) यांचा आज स्मृतीदिन. सातवी पर्यंतच शिक्षण झालेल्या बाळकृष्ण हरी कोल्हटकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच ‘जोहार’ हे नाटक लिहिले होते. लहानपणापासून ते लेखन करत असले तरी त्यांची प्रतिभा नाट्यगीतं व नाटकांमधूनच बहरली. कुटुंबप्रधान कथानक, काळजाला भिडणारी गीते…
-
रत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी
‘रत्नाकर मतकरीं’च्या वैविध्यपूर्ण साहित्य योगदानात त्यांनी बालरंगभूमीसाठी केलेले कार्य विशेष दखल घेण्याजोगे आहे. महाराष्ट्रात मतकरींनी बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वतः पदरमोड करून सुमारे तीस वर्षे बालनाट्यांची निर्मिती केली. बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच त्यांच्यावर मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातीलच एक आहे, ‘वंचितांचा रंगमंच’. या प्रकल्पातून त्यांनी अनाथ तसेच गरीब घरातल्या मुलांना नाटकाचं…
-
बालमनावर चांगले संस्कार करणारी – ‘श्यामची आई’
आता नाव आठवत नाहीये, पण मी शाळेत असताना एकदा पेपरमध्ये बातमी वाचलेली की, कोणीतरी एक वृद्ध गृहस्थ शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकाचे मोफत वाटप करत आहेत. मुलांमध्ये मूल्यसंस्कार रुजावेत म्हणून. असे उपक्रम इतरही अनेकजण आजही नक्कीच करत असतील. इतकं भारी वाटलेलं ती बातमी वाचून. तेव्हापासून आम्ही देखील सर्वांना वाढदिवसाला किंवा सणानिमित्त ‘श्यामची…
-
पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!
पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय? नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे. साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन…
-
दहाजणी – संदर्भ बदलले पण प्रवृत्ती नाही
“चूक तुझी नाहीये, गोपाळा -” मी जरा सौम्यपणे म्हटलं. “चूक तुझ्या नस्त्या वेडगळ नीतिकल्पनांची आहे त्या कल्पनांनी तू स्वतःला जखडून घेतलयस, म्हणून हातपाय हलवू शकत नाहीयेस! मुलगी आपली आहे! तिचा छळ होता, सासरी पटत नाही, तर मग तिला घरी परत आणली पुढं तिची काही प्रगती होईल, असं पाहिलं- हे सगळ शहाणपणाला धरून आहे की नाही?…
-
ती फुलराणी
पुलंच्या ‘ती फुलराणी’ या नाटकाचा किंवा पुस्तकाचा विषय निघाला, आणि तुम्ही ते नाटक पाहिलं असेल-नसेल, पुस्तक वाचलं असेल-नसेल तरी मंजुळेचं पुढील स्वगत तुम्ही एकदातरी नक्कीच ऐकलं असेल. ‘असं काय मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी? थांब…. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा! मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर तुजं…