Tag: पुस्तक ओळख

  • द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

    द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी

    तुम्हाला माहितीये, एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचं प्रमाण आजकाल वाढतंय! आकडेवारी बघितली तर गेल्या २० महिन्यांत पती-पत्नीपैकी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याचा तुलनेत ९० टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत(संदर्भ- वृत्तपत्रं). २ वर्षांपूर्वी एका लीगल फर्म मध्ये प्रॅक्टिस करताना आमच्याकडे बहुतेककरून डिव्होर्सच्या केसेस यायच्या. त्यातही संमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण बरंच जास्त…

  • ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    ‘माणदेशी माणसां’ची अस्सल मराठी शब्दचित्रं

    माणदेशी माणसं हा व्यंकटेश माडगूळकरांचा सर्वात पहिला कथासंग्रह. माणदेशातल्या साध्या, सरळ आणि कष्टकरी माणसांची ही शब्दचित्र इतकी हुबेहूब आणि सुंदररित्या रंगवली आहेत, की वाचताना ती आपल्यासमोर उभी राहतात. अगदी आजही. मला आवडलेला ‘झेल्या’ बघा. ‘बटन नसलेल्या कुडत्याला एक हातानं गळ्याशी धरून झेल्या बिथरल्या खोंडासारखा उभा होता. अंगानं किरकोळच. वयानंही फारसा नसावा. तेरा-चौदा एवढा. डोक्याला मळकट…