marathi mulgi lagn marathi kavita

कुणाचं ऐकायचं?

.
आई सांगते, नेहमी दुसऱ्यांना समजून घ्यायच.
सासूआई सांगते, स्वतःला त्रास करून दुसऱ्याचं मन नाही रमवायचं.
सांगा आता कुणाचं ऐकायचं?
.
वडील सांगतात, स्वतःच्या पायावर उभं राहायचं.
सासरे सांगतात, वडीलधाऱ्यांचा मदतीचा हात कायम सोबत ठेवायचा.
सांगा आता कुणाचं ऐकायचं?
.
भाऊ सांगतो, रिझल्टला महत्व आहे, तयारी तुमच्या पद्धतीने कशीही करा.
दीर सांगतो, साधनेला महत्व आहे. साधना नीट तर रिझल्ट चांगलाच असेल.
सांगा आता कुणाचं ऐकायचं?
.
बहीण सांगते, लोकांचे चेहरे बघताच माणूस कळायला हवा.
वहिनी सांगते, सहवासानेही ओळखायला जमणार नाही अस राहावे.
सांगा आता कुणाचं ऐकायचं?
.
मी विचारांच्या गर्तेत फिरत असते. आणि
नवरा सांगतो प्रॅक्टिकली विचार करून लॉजिकल निर्णय घे.
सांगा आता कुणाचं …
.
काहीही…
नवऱ्याचं कोण ऐकत?
माझी मीच घेईन माझे निर्णय.
 हं..
.
– यशवंत बायको

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *