Category: पुस्तक ओळख
-
WORD POWER सोप्या शब्दात!
हे पुस्तक बिलकुल वाचू नका! असं त्या पुस्तकातच लिहिलंय. हे अभ्यासाव. खूप आकर्षक शब्द, त्यांची फोड, त्या शब्दाचा जन्म, त्या शब्दाची इतर भावंड, त्यांची माहिती आणि उपयोग अशी संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या शब्दात मिळते. मग ते शब्द पाठ करावे लागत नाहीत, आपोआप लक्षात राहतात. आपला उद्देश स्वतःची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवणे हा आहे. पुस्तक वाचायला(अभ्यासायला) सुरुवात…
-
The Code of Extraordinary Mind
हे पुस्तक MUST MUST MUST READ लिस्ट मध्ये आत्ताच नोंद करून ठेवा. पुस्तक महाग वाटतंय तर ३-४ जणांनी वर्गणी काढा.. पण हे पुस्तक वाचाच!! (मी सिरिअसली बोलतोय..! विनोद निर्मिती अज्जीब्बात नाही!) मी तुम्हाला इतकी विनवणी (वजा जबरदस्ती) करतोय कारण हे पुस्तक आहेच तेवढ भारी. आयुष्यात कधीतरी तुम्हाला चाकोरी बाहेर जाऊन काही करू वाटलेलं, पण समाजाच्या…
-
विचार करा आणि श्रीमंत व्हा!
पुस्तक तसं खूप दशकं जून आहे, पण त्यात लिहिलेल्या गोष्टी अजूनही लागू पडतात, आणि चिरंतर लागू पडत राहतील. एखादी डिग्री जशी तुमच्या सोबत आयुष्यभर राहते, तसं ह्या पुस्तकाचं सुद्धा आहे. विचार करण्याच्या पद्धतीला दिशा देऊन जाणार हे पुस्तक. (अशी पुस्तकं वाचताना मला कायम असं वाटतं कि ह्या धड्यांना शालेय अभ्यास क्रमात जागा असावी.) एकाच बैठकीत…
-
तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?
‘तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?’ मध्ये लेखक रॉबिन शर्मा ह्यांनी १०१ टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही सोप्पं, समाधानी आणि सुखी आयुष्य जगायला शिकाल. काही टिप्स अशा सुद्धा आहेत कि ज्या तुम्हाला कसा-बसा १०१ आकडा गाठावा म्हणून लिहिल्या सारख्या वाटतील सुद्धा.. (निदान मला तरी असं वाटलं, प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे). पण हे मात्र तितकंच खरं कि, ह्यातल्या…
-
प्रश्न हीच उत्तरे आहेत
हे पुस्तक वाचकाला ‘नेटवर्क मार्केटिंग’ मध्ये यशस्वी होण्याचं तंत्र उलघडून देतं. लेखक Allan Pease यांनी मानवी स्वभावातले बरेच बारकावे ह्यात मांडले आहेत, ज्याचा उपयोग करून सेमिनार, प्रेझेंटेशन अशा कामात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. लेखकाच्या मते, चांगले नेटवर्कर जन्माला येत नाहीत, ते घडवले जातात. नेट्वर्किंग हे एक ‘विज्ञान’ आहे; त्याला एका विशिष्ट साच्यातून शिकता येऊ शकतं.…
-
माझं चीज कोणी हलवलं?
Who Moved My Cheese? हे असं वेगळंच नाव वाचून ह्या पुस्तकात नक्की काय असेल ह्यांची उत्सुकता मनात निर्माण झाली. हातात घेतल्यापासून अवघ्या २ तासात पुस्तक वाचून झालं आणि एक वेगळच मानसिक समाधान मिळालं. आपल्या रोजच्या कामात, व्यवहारात किंवा नातेसंबंधांत होणाऱ्या सततच्या बदलांना कसं समोर जावं ह्यांची ट्रेनिंग (गोष्ट वाचता वाचता) झाली. स्वतःला मदत करायला शिकवणारं…
-
माणसं हाताळण्याची कला – शिकायचीय का?
प्रश्न: असा कोणता गुण यशस्वी माणसामध्ये असतो ज्यामुळे ते मोठे होतात? उत्तर: त्यांना माणसं हाताळण्याची कला अवगत असते. आणि जर मी तुम्हाला सांगितलं कि हि कला एका दिवसात तुम्हाला शिकता येईल तर? खूष झालात ना 🙂 . कला लोकांशी व्यवहार करण्याची : “The Art of Dealing With People” हे पुस्तक जेव्हा मी वाचलं आणि समजून…
-
६ जादुई सवयी दिवस बनवणाऱ्या
आजकाल बरीच जण मोठ्या अभिमानाने बोलतात कि ‘रात्री लेट झोपून सकाळी लेट उठायची मजाच काही और आहे!’, किंवा… ‘सकाळी लवकर उठून कोणी मोठे झंडे गाडले आहेत म्हणा!’ (तुम्ही पण असं बोलता? तर आता फूल्ल अटेन्शन देऊन वाचा पुढचं) सकाळची वेळ तुम्ही नकोत्या गोष्टींमध्ये वाया घालवताय तर ‘यशस्वी भविष्य’ बनवणं फार अवघड आहे राव तुमच्यासाठी! मी…