Category: पुस्तक ओळख
-
अटळ दुःखातून सावरताना
नाव ऐकूनच या पुस्तकात काय असेल किंवा हे पुस्तक आपल्याला कसं मदत करेल, याची मला उत्सुकता होती. खरं तर असं पुस्तक असेल असं वाटलंही नव्हतं. म्हणजे मानसोपचार तज्ञांची ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर अनेक पुस्तकं आहेत किंवा मरणावर, मरणानंतर किंवा कर्मावर अशी आध्यात्मिक पुस्तकं देखील आहेत. पण असं जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेल्यावर होणाऱ्या…
-
‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना
चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या…
-
‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!
“एक विद्यार्थी म्हणून अभ्यास चालू आहे.” आश्चर्य वाटतं, जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ गजलकार, अब्दुलरहमान करीमभाई शेख उर्फ ए. के. शेख सर असं म्हणतात; ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काव्यलेखनात, मुख्यत्वे करून गझल लेखनात मार्गदर्शन केलेलं आहे. २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहून सुद्धा सर स्वतःला ‘विद्यार्थी’ समजतात तर हा काव्यमहासागर नक्की किती खोल असेल याचा…
-
१० आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!
आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची…
-
‘कहाणी शब्दांची’ – प्रत्येक मराठी घरात असायलाच हवा असा शब्दकोश
काही दिवसांपूर्वी एका उपाहारगृहावरील नावाच्या पाटीवर ‘एकविरा उपकार गूह’ असं लिहिलेलं दिसलं. सहज म्हणून त्यांना सांगावंसं वाटलं की, ते चुकीचं लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं की, ‘ते चुकून झालंय. दुसरी पाटी आहे.’ मी हुश्श! करत दुसरी पाटी पहिली, तर त्यावर लिहिलेलं ‘एकविरा उपहारगृह’. ते ‘उपहार’ नाही ‘उपाहारगृह’ असतं एवढंच सांगून मी निघाले. पण ते एकच…
-
अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह
दिवान म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर अगदी सुरुवातीलाच गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शब्दांत सांगायचं तर ते असं, उर्दू ग़ज़लच्या चारशे वर्षाच्या काळात हजारो गज़ल संग्रह प्रकाशित झाले. त्यांनाही दिवानच म्हटलं जातं. काही शायरांनी मात्र उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून त्यातले प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गजल रचना केल्या.…