Category: पुस्तक ओळख
-
ठाम निर्णय कसे घ्यायचे?
आयुष्यात मनाची दोलायमान स्थिती अनेकदा होते. त्यात तुम्ही खूप जास्त विचार करणारे असाल तर मग अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्येही (पण ज्या तुम्हाला फार मोठ्या आणि महत्वाच्या वाटत असतात) ‘हे करू की ते करू’ अशी अवस्था होते. मोठं होत असताना तर आपल्या निर्णयांची जबाबदारीही पूर्णतः आपल्यावर येते. आणि जेवढी मोठी जबाबदारी तेवढा मोठा मनावर ताण…
-
रत्नाकर मतकरींची गाजलेली बालनाट्य- बालनाटयांच्या आठवणी
‘रत्नाकर मतकरीं’च्या वैविध्यपूर्ण साहित्य योगदानात त्यांनी बालरंगभूमीसाठी केलेले कार्य विशेष दखल घेण्याजोगे आहे. महाराष्ट्रात मतकरींनी बालरंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली आणि स्वतः पदरमोड करून सुमारे तीस वर्षे बालनाट्यांची निर्मिती केली. बालनाट्यांच्या माध्यमातून त्यांनी मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देतानाच त्यांच्यावर मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यातीलच एक आहे, ‘वंचितांचा रंगमंच’. या प्रकल्पातून त्यांनी अनाथ तसेच गरीब घरातल्या मुलांना नाटकाचं…
-
मराठी रहस्य कथा-हाकामारी-हृषीकेश गुप्ते
रहस्यकथा वाचताना एकतर आधीच आपण त्यात एकदम गुंतून गेलेलो असतो. पुढे काय? पुढे काय होणार? ही उत्सुकता कायम मनावर असते, अशावेळी जर लेखकाने आपल्याला अशा एखाद्या वळणावर आणून सोडलं की जिथून आत्ता तुम्हालाच शोध पूर्ण करायचा आहे तर? मग पुढचे चार-पाच दिवस किंवा त्याहूनही जास्त ते कोडं सोडवण्यातच किंवा फक्त त्याचा विचार करण्यातच जातात. हृषीकेश…
-
संदीप खरे – मी अन् माझा आवाज
दादरचं रवींद्र नाट्यमंदिर. ‘संदीप खरे’ आणि ‘वैभव जोशीं’चा, ‘इर्षाद’ हा कार्यक्रम भन्नाट रंगलेला. टाळ्यांच्या गजरात, हास्याच्या गडगडाटात, दिलखुलास दाद देत प्रेक्षक अगदी भावमग्न झालेले आणि संदीप खरेंनी त्यांच्या एका ‘जिवलग’ मित्राबद्दल सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी ‘जिवलग’ होतो दोघे… मी अन् माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो… तो दुसऱ्या…
-
४ प्रेरणादायी ‘आई’ – आयुष्यात एकदातरी वाचायलाच हव्यात अशा
श्यामची आई – साने गुरुजी आई-वडिलांसोबतच ‘श्यामच्या आई’ने केलेल्या संस्कारांमुळे मी तरलो/तरले असे सांगणारे अनेकजण भेटतील. मी देखील त्यातीलच एक. ‘श्यामच्या आई’ने कितीतरी पिढ्या घडवल्या पण फक्त मुलांवर मूल्यसंस्कार केले असं नाही, तर मोठ्यांमध्येही ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’, ‘सावकारी किंवा जोर-जबरदस्ती करून आलेलं धन टिकत नाही’ हे विचार घट्ट रुजवले.आजही कधीतरी एखादं उदाहरण देताना,…
-
दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व
दुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे,…
-
संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे
‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…
-
मैत्री आरोग्याशी
आरोग्यविषयक पुस्तकं वाचून आपण स्वतःच आपले डॉक्टर होत नसतो किंवा व्हायचंही नसतं. आरोग्यविषयक पुस्तकं ही आजार किंवा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे कळावे किंवा प्राथमिक उपचारांबद्दल माहिती व्हावी म्हणून वाचायची असतात. ‘मैत्री आरोग्याशी’ या पुस्तकात डॉ. सुभाष बेन्द्रे सुरुवातीलाच ‘स्वतःचे स्वतः डॉक्टर होऊ नये पण स्वतःचे आरोग्यस्नेही जरूर व्हावे!’ असं सांगत चुकीच्या…