Category: ललित साहित्य
-
गोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी
अवघ्या २५ व्या वर्षी ‘कोसला’ सारखी कादंबरी नेमाडेंना कशी सुचली असेल?, ना.धों. महानोरांनी ‘रानातल्या कविता’ खरंच रानात लिहिल्या असतील का?, ‘उपरा’ प्रकाशित झाल्यावर लक्ष्मण मानेंना मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल काय वाटलं असेल?, रंगनाथ पठारेंनी ‘चक्रव्ह्यूह’ आणि रत्नाकर मतकरींनी ‘आरण्यक’ लिहिण्याआधी कसा अभ्यास केला असेल? असे अनेक प्रश्न मला पडायचे. एखादं पुस्तक लिहिण्याआधी लेखकाला ते कोणत्या घटनेवरून सुचलं…
-
दुपानी- दुर्गाबाई भागवत – एक करारी व्यक्तिमत्व
दुर्गाबाई भागवत म्हणजे एक अत्यंत अभ्यासू, परिपक्व आणि करारी व्यक्तिमत्व. अनेक विषयांमधला त्यांचा व्यासंग दांडगा होता. त्या मानववंश शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ होत्या. त्यांना अनेक देशी-परदेशी भाषा तसेच आदिवासींच्या बोलीभाषा देखील अवगत होत्या. आपल्या लेखनातून त्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैचारिक प्रश्नांवर व्यक्त झाल्याच पण त्याचसोबत कलात्मक आणि दैनंदिन जीवनातील अनेक विषयांवरची आपली तर्कशुद्ध मतं त्यांनी अगदी ठामपणे,…
-
पुलंच्या ‘गाठोड्यात’ नक्की आहे तरी काय!
पुलंचं ‘गाठोडं’ हे पुस्तक वाचलंय? नसेल वाचलं तर एकदातरी नक्की वाचा असं मी सुरुवातीलाच सांगेन. पुस्तकातील ‘पुलं’नी सर्वांगाने मांडलेले विचार, त्यांचा हजरजबाबीपणा, भाषणाचा ओघ, भाषेवरील प्रभुत्व आणि त्यांची निरीक्षण शक्ती विस्मयचकित करणारी आहे. साहित्यासोबतच आयुष्यातील विविध विषयांवर पुलंनी त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अगदी मार्मिक भाषेत लिहिलेल्या लेखांचं, पत्रांचं आणि काही भाषणांचं, ‘भाऊ मराठे’ यांनी केलेलं संकलन…
-
वपु काळे-कथाकथनाची कथा
कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक. प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा.. कॉलेज मध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी…