Category: काव्यसंग्रह
-
प्राजक्तप्रभा – मनस्वी कलाकाराची अभिव्यक्ती
‘प्राजक्ता माळी’चा ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह अनपेक्षित धक्का होता पण पुस्तक हातात आल्यावर आणि वाचल्यावर तो सुखद आहे, हे ठामपणे सांगता येतं. ‘अभिनेत्री, निवेदिका, शास्त्रीय नृत्यांगना आणि लॉकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘आयुष्य भरभरून जगणारी व्यक्ती’ म्हणून नव्याने भेटलेली प्राजक्ता माळी’, या तिच्या सर्व ओळखी या कवितांमधून अगदी मोकळेपणाने भेटतात आणि मनाला भिडतातही. पुस्तकातल्या कित्येक कविता वाचताना…
-
मी माझा – चंद्रशेखर गोखले – चारोळीसंग्रह
मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा वाळकं पान देखील गळताना तन्मयतेने पाहणारा एके काळी चंद्रशेखर गोखलेंच्या चारोळ्यांनी तरुणांना भारावून टाकलं होतं. त्यांचा ‘मी माझा’ हा चारोळी संग्रह तर इतका लोकप्रिय झाला की, अनेकांच्या घरी तर तो असायचाच पण काही मोठ्या रिसॉर्टमध्येही त्या संग्रहातील चारोळ्यांचे मोठे बॅनर, फलक लावलेले पाहायला मिळायचे. ‘मी माझा’च्या तर ६…
-
संदीप खरे – मी अन् माझा आवाज
दादरचं रवींद्र नाट्यमंदिर. ‘संदीप खरे’ आणि ‘वैभव जोशीं’चा, ‘इर्षाद’ हा कार्यक्रम भन्नाट रंगलेला. टाळ्यांच्या गजरात, हास्याच्या गडगडाटात, दिलखुलास दाद देत प्रेक्षक अगदी भावमग्न झालेले आणि संदीप खरेंनी त्यांच्या एका ‘जिवलग’ मित्राबद्दल सांगायला सुरुवात केली. म्हणाले, “एकत्रच राहायचो आम्ही पूर्वी ‘जिवलग’ होतो दोघे… मी अन् माझा आवाज ! आता मी एका घरात राहतो… तो दुसऱ्या…
-
‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना
चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या…
-
सगळं उलथवून टाकणाऱ्या कविता!
भांडी इकू नगस राहू नगस उपाशी अनवाणी चालू नगस लुगड्याला ठिगळ लावू नगस असं म्हणायचास लहानपणी अन मंग आता शाली, नारळ, स्मृतिचिन्ह जी येतात घरात पेपरात असतो, टिव्हीत दिसतो कधीमधी मला सांग शिक्षण जर घेतलं नसतं तर… हे झालं असतं का रे? अडाणी कुठला कवी देवा झिंजाड यांच्या ‘सगळं उलथवून टाकलं पाहिजे’ या पुस्तकातील ही…
-
मी… वगैरे – वैभव जोशी – पुस्तक ओळख
कुठूनही तरंगत येतं एक नातं आपल्यामधल्या कस्तुरीचा पत्ता देऊन जातं… तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का हो कधी आलाय का हो गंध… काही उमलण्याही आधी? कसलं जबरदस्त लिहिलंय हे! कित्ती साधे सोप्पे शब्द पण ते मांडलेतच इतक्या तीव्रतेने की सरळ आपल्या हृदयाचा ठाव घेतात. खरंच! इतकं सुंदर लिहितो वैभव जोशी दादा. (एकेरी नावाने उल्लेख करतेय,…