Category: कादंबरी
-
मराठ्यांची शौर्यगाथा-मुकद्दर-स्वप्निल कोलते पाटील
“मी जर केवळ शिवाजी महाराजांचे चरित्र लिहिले तर, ते पन्नास वर्षांचे होईल, संभाजी महाराज लिहिले तर ३२ वर्षांचे होईल, राजाराम महाराजांचे चरित्र लिहिले तर त्यांचा कार्यकाळ हा ११ वर्षांचा आहे. परंतु ह्या सगळ्यांचा कार्यकाळ बघणारा औरंगजेब सगळ्यांच्या चरित्रांचे चित्रण करण्यासाठी मला सोपा वाटला, म्हणून लिखाणासाठी हे पात्र निवडावंसं वाटलं. बाकी चरित्र जरी औरंगजेबाचं असलं तरी,…
-
बॉडीगार्ड – सत्य कथेवर आधारित बाबा कदमांची गाजलेली कादंबरी
बाबा कदम यांनी लिहिलेली बॉडीगार्ड ही रहस्यमय कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे. बाबा कदम हे वकील होते आणि पोलिसांसोबत काम करत होते. सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांना अशा अनेक केसेस व घटनांना सामोरं जावं लागायचं ज्यातून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिसायचे. या केसेस मधून मिळालेले अनुभव बाबा कदमांनी आपल्या खास शैलीत शब्दबद्ध केले आणि…
-
वपूर्झा – वपु आणि वपुंचे विचार
आजकाल सोशल मीडियावर बऱ्याच जणांच्या पोस्ट, स्टेटस आणि स्टोरीला वपुंचे कोट्स दिसत असतात. त्यातल्या कितीतरी जणांनी ती ‘वाक्यं’ असलेली कथा वाचलेली नसते आणि अनेकांना या ‘कोट्स’ मुळेच वपु माहीत होतात. पण त्या एका वाक्यानेही वाचक म्हणून वपुंसोबत नाळ जुळते हे महत्वाचे. गुगलवर ‘वपु काळे’ म्हणून सर्च केलं की सगळ्यात पहिला पर्याय ‘वपु विचार’ हा येतो.…
-
बकुळा – श्रीमती आणि श्रीकांत यांच्या प्रेमाची साक्ष
गेल्या काही वर्षांपासून श्रीमती ही श्रीकांत देशपांडे यांची अत्यंत कार्यक्षम अशी पर्सनल सेक्रेटरी बनलेली होती. भारतातील आणि भारताबाहेरील कॉर्पोरेट जगतात श्रीकांतचे नाव सर्वतोमुखी झालेलं होतं. ऑफिसात त्याची प्रिया नावाची सेक्रेटरी होतीच, पण त्याला घरातही एका स्मार्ट, विश्वासू आणि मूलभूत जबाबदाऱ्या पेलू शकणाऱ्या आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमान व आज्ञाधारक अशा सेक्रेटरीची गरज होती. श्रीमती बुद्धिमान…
-
लव्हमॅरेज करण्याआधी वाचायलाच हवीत अशी ७ पुस्तकं
मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटात स्वप्नील जोशीचा एक डायलॉग आहे की, ‘आजकाल नाती का तुटतात माहितीये? कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो.’ फार अर्थपूर्ण आहे हे वक्तव्य. लव्हमॅरेज करताना आपल्याला वाटतं, की आपण एकमेकांना खूप चांगले ओळखतो पण बऱ्याच वेळा काही प्रमाणात तो फक्त एक मुखवटा असतो. एक हुरहूर असते, की…
-
द्विदल – प्रत्येक जोडप्याने वाचावी अशी कादंबरी
तुम्हाला माहितीये, एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेण्याचं प्रमाण आजकाल वाढतंय! आकडेवारी बघितली तर गेल्या २० महिन्यांत पती-पत्नीपैकी कोणा एकाला घटस्फोट हवा आहे म्हणून दावा दाखल करण्याचा तुलनेत ९० टक्के जोडपी संमतीने वेगळी होत आहेत(संदर्भ- वृत्तपत्रं). २ वर्षांपूर्वी एका लीगल फर्म मध्ये प्रॅक्टिस करताना आमच्याकडे बहुतेककरून डिव्होर्सच्या केसेस यायच्या. त्यातही संमतीने घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण बरंच जास्त…
-
मॅक्झिम गोर्की – आई
ती उंच होती. थोडीशी पाठीत वाकली होती. आयुष्यभराच्या काबाडकष्टांमुळं आणि नवऱ्याच्या हातचा मार खाण्यामुळं तिचं शरीर जीर्ण झालं होतं. घरात ती आवाज न करता चालायची, धक्का लागून काही पडू नये म्हणून एका बाजूला अंग चोरून चालायची. तिच्या सुरकुत्या पडलेल्या रुंद आणि अंडाकृती चेहऱ्यावर थोडीशी सूज होती, उजव्या भुवईवर एक खोल व्रण होता आणि तिच्या काळ्याभोर…
-
समांतर – शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कथा
आर्थिक विवंचना व आयुष्यात घडत असलेल्या विचित्र घटनांमुळे अडचणीत सापडलेला कुमार महाजन त्याच्या मित्राच्या, वाफगांवकरच्या सांगण्यावरून एका प्रसिद्ध स्वामींकडे आपलं भविष्य जाणून घ्यायला जातो. खरंतर कुमार महाजनचा या सगळ्यावर विश्वास नसतोच, परत त्यात अतिशय घाण, अंधाऱ्या, गलिच्छ, टेकू लावलेल्या व कधीही कोसळेल अशा स्थितीतील इमारतीत हे स्वामी रहात असलेले बघून यात कुठे अडकलो असंच वाटत…