Category: माहितीपर
-
गोष्ट खास पुस्तकाची – १५ गाजलेल्या लेखकांच्या पुस्तकाची कहाणी
अवघ्या २५ व्या वर्षी ‘कोसला’ सारखी कादंबरी नेमाडेंना कशी सुचली असेल?, ना.धों. महानोरांनी ‘रानातल्या कविता’ खरंच रानात लिहिल्या असतील का?, ‘उपरा’ प्रकाशित झाल्यावर लक्ष्मण मानेंना मिळालेल्या प्रसिद्धीबद्दल काय वाटलं असेल?, रंगनाथ पठारेंनी ‘चक्रव्ह्यूह’ आणि रत्नाकर मतकरींनी ‘आरण्यक’ लिहिण्याआधी कसा अभ्यास केला असेल? असे अनेक प्रश्न मला पडायचे. एखादं पुस्तक लिहिण्याआधी लेखकाला ते कोणत्या घटनेवरून सुचलं…
-
प्रा. शिवाजीराव भोसले यांची वकृत्वाची कथा
ज्यांच्या ओघवत्या व ओजस्वी वकृत्वाने अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले, ज्यांना वक्ता दशसहस्त्रेषु म्हंटले गेले, ज्यांनी ५ दशकाहून अधिक काळ आपल्या व्याख्यानमालेतून जनजागृती केली असे व्यासंगी आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा आज स्मृतीदिन. प्रा.शिवाजीराव अनंतराव भोसले (जुलै १५, १९२७ – जून २९, २०१०) यांची लेखक, उत्कृष्ट वक्ते यासोबतच विद्यार्थीप्रिय प्राचार्य ही एक महत्वाची ओळख. फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये ते सुमारे २५…
-
यूपीएससी ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी पुस्तकं
UPSC यूपीएससी च्या विद्यार्थ्यांचा पुस्तकं कुठे मिळतील हे शोधण्यात जाणारा वेळ थोडातरी कमी व्हावा या हेतूने यूपीएससीच्या ‘मराठी साहित्य’ या वैकल्पिक विषयाच्या तयारीसाठी लागणारी पुस्तकं जिथून घेता येतील अशा ऑनलाइन वेबसाईट्स व प्रकाशक, पुस्तक विक्रेते यांसोबत संपर्क करण्यासाठी माहिती या लेखातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. UPSC मराठी साहित्य वैकल्पिक विषय(Main Exam) संदर्भ पुस्तिका पुढीलप्रमाणे –…
-
‘कहाणी शब्दांची’ – प्रत्येक मराठी घरात असायलाच हवा असा शब्दकोश
काही दिवसांपूर्वी एका उपाहारगृहावरील नावाच्या पाटीवर ‘एकविरा उपकार गूह’ असं लिहिलेलं दिसलं. सहज म्हणून त्यांना सांगावंसं वाटलं की, ते चुकीचं लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं की, ‘ते चुकून झालंय. दुसरी पाटी आहे.’ मी हुश्श! करत दुसरी पाटी पहिली, तर त्यावर लिहिलेलं ‘एकविरा उपहारगृह’. ते ‘उपहार’ नाही ‘उपाहारगृह’ असतं एवढंच सांगून मी निघाले. पण ते एकच…
-
१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व – अनुजा जोशी लिमये
स्वामी विवेकानंद एका ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणत आणि रोज ते परत करत. एक दिवस ग्रंथालयातील कर्मचाऱ्याने विचारले, ‘तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी घेऊन जाता की बघण्यासाठी?’ यावर विवेकानंदांनी उत्तर दिले, की ‘वाचण्यासाठी. तुम्ही मला त्या पुस्तकातलं काहीही विचारा.’ कर्मचाऱ्याने एक पान उघडले आणि त्याचा क्रमांक सांगून विचारले, ‘सांग, त्यावर काय लिहिले आहे?’ आणि विवेकानंदांनी न बघता…
-
सेवानिवृत्त झालात! पुढे काय?
वडील निवृत्त होतात तेव्हा मुलं मोठी झालेली असतात. निवृत्तीआधी ते १०-१२ तास नोकरीनिमित्त घराबाहेर असतात. तेव्हा बायकोचे,मुलांचे व घरातील इतर सदस्यांचे एक वेळापत्रक किंवा काम ठरलेले असते. वडील नोकरी करत असताना घरी आले की, मुलं मोठी झाली असतील तरी, ‘बाबा आलात का?’ इतकं तरी विचारतात, पत्नी वाट पहात असते, नाश्ता, जेवण इतर तयारी हसतखेळत किंवा…
-
एक पूर्ण अपूर्ण
निवृत्त IAS ऑफिसर आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचे आज (दि. १६ जुलै २०२० रोजी) निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा लेख. मध्यंतरी नीला सत्यनारायण यांचं ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर लेखन असलेलं पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात त्यांचा व त्यांच्या डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाचा ‘चैतन्य’चा खडतर प्रवास त्यांनी रेखाटला…