Category: चरित्र
-
४ प्रेरणादायी ‘आई’ – आयुष्यात एकदातरी वाचायलाच हव्यात अशा
श्यामची आई – साने गुरुजी आई-वडिलांसोबतच ‘श्यामच्या आई’ने केलेल्या संस्कारांमुळे मी तरलो/तरले असे सांगणारे अनेकजण भेटतील. मी देखील त्यातीलच एक. ‘श्यामच्या आई’ने कितीतरी पिढ्या घडवल्या पण फक्त मुलांवर मूल्यसंस्कार केले असं नाही, तर मोठ्यांमध्येही ‘अंथरूण पाहून पाय पसरावे’, ‘सावकारी किंवा जोर-जबरदस्ती करून आलेलं धन टिकत नाही’ हे विचार घट्ट रुजवले.आजही कधीतरी एखादं उदाहरण देताना,…
-
१० आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!
आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची…
-
१११ जगप्रसिद्ध व्यक्तिमत्व – अनुजा जोशी लिमये
स्वामी विवेकानंद एका ग्रंथालयातून रोज एक पुस्तक आणत आणि रोज ते परत करत. एक दिवस ग्रंथालयातील कर्मचाऱ्याने विचारले, ‘तुम्ही पुस्तक वाचण्यासाठी घेऊन जाता की बघण्यासाठी?’ यावर विवेकानंदांनी उत्तर दिले, की ‘वाचण्यासाठी. तुम्ही मला त्या पुस्तकातलं काहीही विचारा.’ कर्मचाऱ्याने एक पान उघडले आणि त्याचा क्रमांक सांगून विचारले, ‘सांग, त्यावर काय लिहिले आहे?’ आणि विवेकानंदांनी न बघता…
-
कहाणी लंडनच्या आजीबाईंची – सरोजिनी वैद्य
विद्या बालनच्या ‘शकुंतलादेवी’ सिनेमामध्ये शकुंतलादेवी जेव्हा पहिल्यांदा लंडनला जातात तेव्हा त्या तेथील एका गेस्ट-हाऊस/लॉजिंग-बोर्डिंग मध्ये काही दिवस राहिलेल्या दाखवलंय. त्या बोर्डिंगच्या मालक एक नऊवारी नेसलेल्या मध्यमवयीन महाराष्ट्रीय महिला आहेत, हे बघून मला खुप आश्चर्य वाटलेलं. म्हणजे लंडनसारख्या शहरात इतक्या जुन्या काळात एका मराठी महिलेच्या मालकीचं लॉजिंग-बोर्डिंग असणं आश्चर्य वाटण्यासारखंच आहे ना! एका दृश्यात नऊवारीवर…
-
रानमित्र – माणसाला प्राण्यांची खरी ओळख करून देणारा
हेमलकसामधील लोकबिरादरी प्रकल्पासोबतच तेथील वन्य प्राण्यांच्या अनाथालयाबद्दल किंवा प्रकाश आमटेंच्या शब्दात सांगायचं तर त्यांच्या ‘प्राण्यांच्या गोकुळा’बद्दल सर्वांनाच फार कुतूहल वाटतं. अस्वल, वाघ, सिंह, बिबटे, साप अशा प्राण्यांसोबत खेळीमेळीने कसं कोण राहू शकत, भीती नाही वाटत का असे बरेच प्रश्न या वातावरणापासून दूर असणाऱ्यांना पडणं साहजिक आहे. प्रकाश आमटे सर ‘रानमित्र’ या पुस्तकात सांगतात की, ‘शहरात…
-
प्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’
‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक इतकं प्रेरणादायी का वाटतं, याबद्दल उत्तर देताना एकदा ‘वीणा गवाणकर’ मॅडम बोलल्या होत्या की, “आपल्याला धाडस आवडतं. मला मुलांना हेच सांगायचं होतं, की धाडस किती प्रकारचं असतं? केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे फक्त धाडस नाही. धाडस, परिस्थितीवर मात करणं असतं. आपण जो एक निर्णय घेतलाय, त्यावर…
-
वपु काळे-कथाकथनाची कथा
कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक. प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा.. कॉलेज मध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी…
-
एक पूर्ण अपूर्ण
निवृत्त IAS ऑफिसर आणि महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण याचे आज (दि. १६ जुलै २०२० रोजी) निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा लेख. मध्यंतरी नीला सत्यनारायण यांचं ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर लेखन असलेलं पुस्तक वाचनात आलं होतं. त्यात त्यांचा व त्यांच्या डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलाचा ‘चैतन्य’चा खडतर प्रवास त्यांनी रेखाटला…
-
‘मलाला’- सामन्यांमधल्या असामान्यत्वाची कहाणी!
शस्त्रांच्या साहाय्यानं तुम्ही दहशतवाद्याला मारू शकता; पण शिक्षणाच्या मदतीनं तुम्ही दहशतवाद नष्ट करू शकता. – मलाला युसूफझई. वयाच्या सतराव्या वर्षी ‘नोबेल शांतता पुरस्कारा’सारख्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित झालेल्या आणि अवघ्या १४व्या वर्षी क्रूर तालिबान्यांसमोर त्यांच्याशी झगडण्यासाठी निडरपणे उभं राहण्याचं धाडस करणाऱ्या ‘मलाला युसूफझई’ची कहाणी जात-पात, देश-प्रदेश, वय या सगळ्याचं बंधन तोडून जगातल्या प्रत्येकाला तिची दखल घ्यायला…