Category: कविता

  • बिझी चिऊ ताई

    बिझी चिऊ ताई

    . नव्याने ऑफिसला जात असलेल्या चिऊताईची कहाणी . बाकी- चिऊताई चिऊताई, व्हॉट्सऍप उघड. चिऊताई- थांब मला थोडावेळ झोपुदे. . बाकी- चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड. चिऊताई- थांब माझं ऑफिसमधल काम होउदे. . बाकी- चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड. चिऊताई- थांब मला ट्रेनच्या गर्दीमधला प्रवास संपवू दे. . बाकी – चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड. चिऊताई – थांब मला…

  • कुणाचं ऐकायचं?

    कुणाचं ऐकायचं?

    . आई सांगते, नेहमी दुसऱ्यांना समजून घ्यायच. सासूआई सांगते, स्वतःला त्रास करून दुसऱ्याचं मन नाही रमवायचं. सांगा आता कुणाचं ऐकायचं? . वडील सांगतात, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. सासरे सांगतात, वडीलधाऱ्यांचा मदतीचा हात कायम सोबत ठेवायचा. सांगा आता कुणाचं ऐकायचं? . भाऊ सांगतो, रिझल्टला महत्व आहे, तयारी तुमच्या पद्धतीने कशीही करा. दीर सांगतो, साधनेला महत्व आहे.…

  • शोध

    शोध

    परमात्मा हवा आहे, अविनाशी ह्या आत्म्याच्या शाश्वत सुखासाठी सारथी हवा आहे, कलयुगी ह्या अर्जुनाला मार्ग क्रमणासाठी जन्म नको अन मृत्यूही सुटकारा हवा आहे मोक्ष प्राप्तीसाठी हवी आहे भगवद्गीता विज्ञानाला कारण देऊन समजवण्यासाठी प्रयोग हवे अन निष्कर्षही शास्त्रञांना वैदिक शस्त्रे पटवण्यासाठी शोधत आहेत ते शक्यता महाभारत घडल्याची श्रीकृष्ण असल्याची शोधत आहे मी सत्यता कृष्णार्जुनाच्या संवादाची भगवंताच्या…

  • प्रेम

    प्रेम

    अभंगासारखं पूर्णत्व असणार, जगण्याला अर्थ देणार.. तडजोडीच्या जोडीशिवाय कोणताही बांध न फोडता मनं सांधणार.. बोटभर ओळीत लिहून सांगता आलं नाही तरी, न बोलता व्यक्त होणार.. संवेदनक्षम मनांमधल्या निरागस भावना, अलवार जपणार.. बेफाम इच्छांसोबत वेळीस त्यांवर लगाम लावणार.. दुभंगलं तरी एकसंध असणार, आभाळासारखं शुभ्र प्रेम.. 🙂 -यशवंत दिडवाघ . . . ता. क. :- कवीच्या इतर…

  • जगणं वसूल

    जगणं वसूल

    स्वप्न पहायला शिकलो की जगणं वसूल, त्यातलं एखादं जगता आलं तरी जगणं वसूल.. . उंच डोंगर, दुसऱ्याचा हात न धरता, चढायला शिकलो तरी जगणं वसूल.. . दहा गोष्टी मेहेनतीने कमवून, त्यातली एक दान दिली तरी जगणं वसूल.. . मनात आलेली लहानशी इच्छा मन न मारता, पूर्ण करता आली तरी जगणं वसूल.. . विद्यापीठाचे कागद नुसता…

  • माती

    माती

    माझी ‘माती’ सुद्धा ह्यांनी रविवार बघून घेतली, रडण्याच्या नावाखाली मित्रमंडळी भेटली,   जाऊ विचार केला होता रानी-वनी सन्यासाला, सारी प्रपंचाची मेंढरं मला तिथंच भेटली,   होता दिवा उशाखाली म्हणून निश्चिन्त राहिलो, माझी अंधारी झोपडी काल त्यानेच पेटली,   दिली जमिन मी सारी दान-धर्माच्या वाट्याला, माझ्या पोरांनी ती पुन्हा त्यांना मारून घेतली,   केल्या अगणित फेऱ्या…

  • रंग

    रंग

    चेहेऱ्यात अडकला जीव येते की रे कीव मला वेड्यांची, झाले परि आंधळे त्यांना जी न कळे कला जगण्याची, राहशील किती तू व्यस्त करी उध्वस्त जगणे स्वतःचे, समज नाही बुद्धीची अंती वृद्धीची गणितं प्रगतीचे, घालवी सर्व आयुष्य समजुनी तुच्छ जे दिसे काळे, बगळा असो वा कावळा दोन्ही आकाशी उंच उडती रे, दोन्हीची वेगळी भूक वेगळी रीत…

  • सावित्री मी

    सावित्री मी

    सावित्री मी अहिल्या मी जीती जागती मलाला मी, झाशी मधली खाकी मधली गगन भरारी कल्पना मी.. पंख जरासे पसरु दया, उडू दया, मला जगू दया.. कुणी येईल समोर त्याला प्रेमळ तितकिच कठोर मी, सरस्वतीच्या रूपामधली महिशासुर मर्दिनीही मी.. सावित्री मी.. निपक्षपाती आई बनते अंगाईतली गाणी म्हणते, तुझीच सीता पतिव्रता मी वेळ प्रसंगी दुर्गा बनते.. सावित्री…

  • “दादर”

    “दादर”

    ‘येथे कविता लिहून मिळतील’ कविता संग्रहात दुसऱ्यांसाठी मी बऱ्याच कविता लिहिल्या. पण ह्या कवितासंग्रहातली ‘दादर’ हि माझी सगळ्यात आवडती कविता… जी मी माझ्या स्वतःसाठी लिहिली होती. दादर मध्ये राहिलेल्या प्रत्येकाला हि कविता तितकीच भिडेल अशी आशा करतो..   “दादर” माया मुंबईची जणू काया आईची.. रंगीत साडीचा मखमली पदर.. दादर.. माझं अर्ध घर.. दंगलीने हादरलेली, गर्दी घट्ट धरलेली, अहोरात्र भार उचलत छातीवर,, दादर.. माझं अर्ध घर.. दिवाळीच्या दिव्यांनी लखलखणारी, मराठमोळी कोमल नारी, जणू स्वर्ग अप्सरा नांदते जमिनीवर, दादर.. माझं अर्ध घर.. मागेल ते ती लगेच देते, पोटाची बुद्धीची भूक भागवते.. आहे एक अनोखं ज्ञानाचं आगर, दादर.माझं अर्ध घर..…

  • या मोर्चा मधे

    या मोर्चा मधे

    या मोर्चा मधे इथं भांडण चाल्लीत, म्हणे ही सारी दलीत, पर मरणार माणुस.. या मोर्चा मधे!  .  . मरणारा मारणारा, जातीला तो सांगणारा, व्यर्थ ओरडणारा तूच, कोण उच्च कोण नीच, कोणी केसाला खेचील, कोणी देशाला विकिल, पोरका तूच होशील वेड्या.. या मोर्चा मुळे  .  . का दगड़ मारीला, कसा कागद फाडीला झाला जनावर तूच, खून…