Category: by Yashwant Didwagh
-
एका नवोदित वाचकाचा प्रवास
गेले काही महिने मी प्रत्येक आठवड्यात वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल लिहित आलोय. आठवड्याला एक पुस्तक वाचून लगेच दुसरं पुस्तक हातात घेताना मला काही अडचणी जाणवल्या. त्या खालील प्रमाणे- पुस्तक पूर्ण वाचून होतं, तेव्हा तुम्ही त्या पुस्तकाच्या प्रभावात राहणं पसंत करता, त्या पुस्तकासोबत तुम्हाला एक कनेक्शन जाणवायला सुरुवात होते. (नवीन आठवड्याला नवीन पुस्तक अशा गणिताने) लगेच दुसऱ्या…
-
सबबी ज्या तुम्ही पुस्तक न वाचण्यासाठी देता
पुस्तकं का वाचली जात नाही, याबद्दल आम्ही काही प्रतिक्रिया घेतल्या होत्या. वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल आमचे अभिप्राय आम्ही ह्या ब्लॉग वर पोस्ट करतोय. ह्या मागचा ‘पवित्र’ हेतू हा कि आमच्या परिचयातील आणि सर्वच स्तरातील लोकांनी पुस्तकं वाचण्यास जोमाने सुरुवात करावी. ह्या उपक्रमानंतर काही अंशी माझ्या मित्रांनी पुस्तकं वाचून काढली देखील तर काहींची अर्ध्यात आहेत. काही ‘मी वाचायला…
-
‘कवितेतून गाण्याकडे’ जाताना
चिंब पावसानं रान झालं आबादानी झाकू कशी पाठीवरली चांदण गोंदणी. राजा तुझे हात माझ्या हातात गुंफोनी उन्हात चांदणं आलं लाज पांघरोनी. या सुंदर ओळी लिहिणारे जेष्ठ कवी-गीतकार ना. धों. महानोर, यांच्या ‘कवितेतून गाण्याकडे’ पुस्तकात त्यांनी लहानपणापासून लिहायला कशी सुरुवात केली, त्यांच्या लिखाणात येणारे विषय, शब्द त्यांना अगदी नाकळत्या वयात कुठे आणि कसे मिळाले, त्यांनी त्या…
-
‘छंदाक्षरी’ – काव्यलेखन प्रवासातील योग्य दिशादर्शक!
“एक विद्यार्थी म्हणून अभ्यास चालू आहे.” आश्चर्य वाटतं, जेव्हा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेले जेष्ठ गजलकार, अब्दुलरहमान करीमभाई शेख उर्फ ए. के. शेख सर असं म्हणतात; ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना काव्यलेखनात, मुख्यत्वे करून गझल लेखनात मार्गदर्शन केलेलं आहे. २० पेक्षा जास्त पुस्तकं लिहून सुद्धा सर स्वतःला ‘विद्यार्थी’ समजतात तर हा काव्यमहासागर नक्की किती खोल असेल याचा…
-
अमृताची पालखी – मराठी भाषेतील पहिला दिवान – गझल संग्रह
दिवान म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर अगदी सुरुवातीलाच गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शब्दांत सांगायचं तर ते असं, उर्दू ग़ज़लच्या चारशे वर्षाच्या काळात हजारो गज़ल संग्रह प्रकाशित झाले. त्यांनाही दिवानच म्हटलं जातं. काही शायरांनी मात्र उर्दू मुळाक्षरं नजरेपुढे ठेवून त्यातले प्रत्येक अक्षर ‘अलिफ’ पासून ‘ये’ पर्यंत काफिया व रदीफच्या स्वरुपात घेऊन त्यावर गजल रचना केल्या.…
-
Advantage India – From Challenge to Opportunity
निवडणुकीचा सीजन आणि हे पुस्तक वाचण्याचा झालेला मूड. जबरदस्त कॉम्बिनेशन! डॉ. अवुल पाकीर जैनुलाब्दीन (APJ) अब्दुल कलाम आणि श्रीजन पाल सिंग यांच्या प्रगल्भ ज्ञानाचा या पुस्तकामार्फत युवा पिढीला दिशा देण्यासाठी छान प्रकारे वापर केला गेला आहे. तुम्ही जिज्ञासेपोटी एक-दोन पानं वाचायला सुरुवात करता आणि पुस्तकातील दोघांचे व्यक्तिगत अनुभव, तांत्रिक माहिती आणि किस्से वाचता-वाचता कधी तुम्ही…
-
४ महत्वाच्या गोष्टी – लोकांची मनं जिंकण्यासाठी
डेल कार्निगी एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी लाख्खो लोकांना रोजच्या जगण्यातल्या अशा सवयी सांगितल्या कि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. त्यांनी जागतिक स्तरावर सर्वात जास्त खप होणारी बरीच पुस्तकं लिहिली. ‘How To Win Friends & Influence People’ हे देखील त्यातलंच एक पुस्तक. ह्यात त्यांनी लोकांसोबत बोलताना/वावरताना कसं वागावं म्हणजे सगळं काही सुरळीत पार पडतं ह्या संबधित मार्गदर्शन…
-
‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.
४० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत, ८ वर्ष न्यूयॉर्क टाईम्सचं बेस्ट सेलर असलेल्या ह्या पुस्तकाच्या लाख्खो प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत. ह्यात लेखक डॉन मिग्युल रुईझ ४ फार सोप्या विषयांवर भाष्य करतात. आपण आपल्यावर नकळत काही मर्यादा लादून घेतल्या आहेत. हे पुस्तक वाचता वाचता तुम्ही त्यातून मुक्त होता. वाचनाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक खूप हलक वाटेल,…
-
Subtle Art of Not Giving a F*ck
तरुण मंडळींची नजर ‘सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग अ फ*’ ह्या नावाने बऱ्यापैकी आकर्षित करून घेतली. लेखक मार्क मेंसन सुद्धा एक तरुणच, मग त्याला आजकालच्या तरुणाईची नस बरोबर सापडली. आणि हे पुस्तक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बेस्ट सेलिंग लिस्ट मध्ये गणल जाऊ लागलं. ह्या अशा नावामुळे आत काय लिहिलंय ह्याची उत्सुकता ताणली जाण साहजिकच आहे. पुस्तकं…
-
WORD POWER सोप्या शब्दात!
हे पुस्तक बिलकुल वाचू नका! असं त्या पुस्तकातच लिहिलंय. हे अभ्यासाव. खूप आकर्षक शब्द, त्यांची फोड, त्या शब्दाचा जन्म, त्या शब्दाची इतर भावंड, त्यांची माहिती आणि उपयोग अशी संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या शब्दात मिळते. मग ते शब्द पाठ करावे लागत नाहीत, आपोआप लक्षात राहतात. आपला उद्देश स्वतःची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवणे हा आहे. पुस्तक वाचायला(अभ्यासायला) सुरुवात…