Category: by Ashwini Surve
-
भावासारखा मित्र
‘आज पण चार चपात्या! चंदूअण्णा, तुम्हाला नको बोललो ना! मी बनवतो की काहीतरी! कशाला उगाच वैनीला त्रास!’ ‘आरं, गप की बाबा! कसला तरास त्यात! ते काय जास्त हाय व्हय! चार चपात्या अन इतकुशी भाजी. तिला काय जड नाय जात!’ ‘आव्हो पण…’ ‘आरं बाबा, तिला नाय कसला तरास! ती सोताच मनापासनं दिती डबा. खा आता पटदिशी.…
-
प्रेरणादायी पुस्तक – ‘एक होता कार्व्हर’
‘एक होता कार्व्हर’ हे पुस्तक इतकं प्रेरणादायी का वाटतं, याबद्दल उत्तर देताना एकदा ‘वीणा गवाणकर’ मॅडम बोलल्या होत्या की, “आपल्याला धाडस आवडतं. मला मुलांना हेच सांगायचं होतं, की धाडस किती प्रकारचं असतं? केवळ बलदंड असणं, गोळी मारणं, एखाद्याला हाणून पाडणं म्हणजे फक्त धाडस नाही. धाडस, परिस्थितीवर मात करणं असतं. आपण जो एक निर्णय घेतलाय, त्यावर…
-
आनंदाचा बाप्पा!
बाप्पाला नवस केलेला. आमची नित्या आणि अणव! त्याचाच आशीर्वाद! जुळी भावंड. अतिशय गोड! खूप गुणी! अगदी नावासारखी. बाप्पा तर त्यांचा फेव्हरेट. अगदी, माय फ्रेंड गणेशा! 5 वर्षांचा नवस बोललेला. नंतर जमलं तर बघू. पण नाहीच जमलं. मागचं वर्ष शेवटचं. वर्षं कशी पटकन निघून गेली. कळलंच नाही. मुलं यावेळी एकदम शांत. आठवणीत हरवून गेलेली. त्यांना फार…
-
तिच्यासाठी वडापाव
वडापाव. घरात सगळ्यांचा फेव्हरेट. तसं, पोरांना नाही एवढं कौतुक, पण माझ्या आठवणीतला मोठा हिस्सा. मुंबईत शिकायला आलो, तेव्हा कित्येक रात्री वडापाव वरच गेल्या. लहानपणीसुद्धा. दर बुधवारी वाट बघायचो. आई आठवड्याच्या बाजाराला जायची. घेवडा, उडीद, लसूण विकायला. तेवढेच चार पैसे जास्तीचे संसाराला. येताना हमखास वडापाव आणायची. लिंबाएवढा. पेपरात गुंडाळलेला. 2 रुपयाचा. प्रत्येकाला एक. चार भावंड. आमचं…
-
वपु काळे-कथाकथनाची कथा
कथा परिणामकारकतेनं कथन करता येणं ही एक कला आहे. ही कला एखाद्या व्रतासारखी जोपासताना आलेल्या अनुभवांचं कथन म्हणजेच वपुंच ‘कथाकथनाची कथा’ हे पुस्तक. प्रसिद्ध कवी ‘प्रवीण दवणे’ यांनी त्यांच्या फेसबुक वॉल वर सांगितलेला हा ‘वपुं’चा एक किस्सा.. कॉलेज मध्ये असताना एका वर्षाला, ‘प्रवीण दवणे’ सर, त्यांच्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळाचे प्रमुख होते; तेव्हा सर्व मुलांनी…
-
रव्याचा केक
दहावीच्या निकालानंतर सई आठवते. दरवर्षी, न चुकता. माझा रिजल्ट तर मी कधीच विसरले. तसा कोणाच्या लक्षात राहण्यासारखा नव्हताच. आम्ही सामान्य, आमचा अभ्यास सामान्य, आणि रिजल्ट तर त्याहून सामान्य. असो, रात गई, बात गई.. कशाला जुन्या आठवणी. पण, ‘सई’ आठवते. मलाही आणि माझ्या आईलाही. आईला तर जरा जास्तच कौतुक तिचं… तशी होतीच ती. अभ्यासू, हुशार, शांत,…
-
अग्निपंख – Wings Of Fire
आत्मचरित्र – ए पी जे अब्दुल कलाम सहायक – अरुण तिवारी मूळ इंग्रजी पुस्तक – विंग्स ऑफ फायर अनुवाद – माधुरी शानभाग किंमत – २२०/- जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम देऊ शकतो. तसं तर ‘अग्निपंख’ या पुस्तकाबद्दल प्रत्येकाला…
-
वेगळं शिक्षण
कालच एक बातमी वाचली, ‘ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब घेण्याची घरच्यांची परिस्थिती नसल्याने मुलाची आत्महत्या’… खूप सारे विचार, प्रश्न मनात येऊ लागले. आता या बातमीचा अँगल खरा की बनवलेला! ऑनलाइन शिक्षण चांगले की गरिबांवर अन्याय करणारे असे अनेक अभ्यासाचे आणि वादाचे मुद्दे होऊ शकतात, पण मला सर्वात आधी महानगरपालिकेच्या शाळेत नववीत शिकणारा ‘गणेश’ आठवला. मागच्या वर्षी करियरविषयक…