Category: by Ashwini Surve
-
संयुक्त महाराष्ट्राची ५० वर्षे – संपादक – प्रा. विलास रणसुभे
‘भाषावार प्रांतरचनेसाठी प्रदीर्घ लढा देणारे महाराष्ट्र’ अशी इतिहासात महाराष्ट्राची नोंद आहे. अंगावर काटा येतो हे वाचून. महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे यासाठी एकशे पाच हुतात्म्यांनी आपले बलिदान केले. रस्ते रक्ताने माखले होते. लाखोंनी तुरूंगवास भोगला. बिगर महाराष्ट्रीयही या लढ्यात सहभागी होते. मुंबईतील हुतात्मा चौकाजवळून जाता-येताना तेथील शिल्प पाहून मन आदराने आणि अभिमानाने भरून येतं पण या…
-
वाचनाची आवड वाढवणाऱ्या ७ गोष्टी
अनेकजणांना वाचनाचं महत्व माहीत असतं पण एखादं पुस्तक वाचायला घेतलं की कंटाळा येतो, झोप येते. कधीकधी उत्साहात वाचन सुरू केलं तरी काही पानं वाचल्यावर पुस्तकाचा विषय किंवा लेखकाची शैली आवडत नाही, मग चिडचिड होते आणि कधी इतरांनी सांगितलंय म्हणून तेवढं एक पुस्तक वाचलं जातं तर कधी पुस्तक वाचनाचा नादच सोडून दिला जातो. असं का होत…
-
जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने वाचन संस्कृती
अनेकांच्या आयुष्यात पुस्तकांची ओळख ग्रंथालय व ग्रंथपालांच्या सोबतीने होत असते. ‘हे पुस्तक तुझ्यासाठी उत्तम आहे’, ‘या विषयावर माहिती हवी असेल तर हे पुस्तक वाच’, ‘ही पुस्तकं तुम्ही वाचायलाच हवीत’ असं सांगणारे ग्रंथपाल तुमच्या आयुष्यात आले असतील तर तुम्ही भाग्यवानच. पुस्तकं तर गुरु आणि मित्र असतातच पण योग्य गुरूंपर्यंत तुम्हाला पोहचवणारेही गुरूस्थानी असतात. ‘ग्रंथालये ही लोकशाही…
-
मैत्री आरोग्याशी
आरोग्यविषयक पुस्तकं वाचून आपण स्वतःच आपले डॉक्टर होत नसतो किंवा व्हायचंही नसतं. आरोग्यविषयक पुस्तकं ही आजार किंवा रोग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे कळावे किंवा प्राथमिक उपचारांबद्दल माहिती व्हावी म्हणून वाचायची असतात. ‘मैत्री आरोग्याशी’ या पुस्तकात डॉ. सुभाष बेन्द्रे सुरुवातीलाच ‘स्वतःचे स्वतः डॉक्टर होऊ नये पण स्वतःचे आरोग्यस्नेही जरूर व्हावे!’ असं सांगत चुकीच्या…
-
अटळ दुःखातून सावरताना
नाव ऐकूनच या पुस्तकात काय असेल किंवा हे पुस्तक आपल्याला कसं मदत करेल, याची मला उत्सुकता होती. खरं तर असं पुस्तक असेल असं वाटलंही नव्हतं. म्हणजे मानसोपचार तज्ञांची ‘मानसिक आरोग्य’ या विषयावर अनेक पुस्तकं आहेत किंवा मरणावर, मरणानंतर किंवा कर्मावर अशी आध्यात्मिक पुस्तकं देखील आहेत. पण असं जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून कायमची निघून गेल्यावर होणाऱ्या…
-
१० आत्मचरित्रं – स्त्रियांचं भावविश्व उलगडणारी!
आत्मचरित्र हा माझा आवडता साहित्यप्रकार. एखाद्या उत्तम आत्मचरित्रातून वाचकांना कितीतरी गोष्टी घेता येतात. लेखकाचा प्रवास, त्यांचे विचार, त्यांची दैनंदिनी, एखाद्या कृतीमागची प्रेरणा, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे किंवा महत्वाचे प्रसंग, घडामोडी, त्यामागची कारणे आणि यातून त्यांची जडणघडण कशी झाली याचा उलगडा होतो. त्यांच्या जडणघडणीत प्रभावी ठरलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्वही त्यातून उलगडत असते. अनेक घटनांमधून काळाची, मनाची, स्वभावाची…
-
‘कहाणी शब्दांची’ – प्रत्येक मराठी घरात असायलाच हवा असा शब्दकोश
काही दिवसांपूर्वी एका उपाहारगृहावरील नावाच्या पाटीवर ‘एकविरा उपकार गूह’ असं लिहिलेलं दिसलं. सहज म्हणून त्यांना सांगावंसं वाटलं की, ते चुकीचं लिहिलं आहे. तर त्यांनी सांगितलं की, ‘ते चुकून झालंय. दुसरी पाटी आहे.’ मी हुश्श! करत दुसरी पाटी पहिली, तर त्यावर लिहिलेलं ‘एकविरा उपहारगृह’. ते ‘उपहार’ नाही ‘उपाहारगृह’ असतं एवढंच सांगून मी निघाले. पण ते एकच…