busy sparrow marathi kavita chimani

बिझी चिऊ ताई

.
नव्याने ऑफिसला जात असलेल्या चिऊताईची कहाणी
.
बाकी- चिऊताई चिऊताई, व्हॉट्सऍप उघड.
चिऊताई- थांब मला थोडावेळ झोपुदे.
.
बाकी- चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड.
चिऊताई- थांब माझं ऑफिसमधल काम होउदे.
.
बाकी- चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड.
चिऊताई- थांब मला ट्रेनच्या गर्दीमधला प्रवास संपवू दे.
.
बाकी – चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड.
चिऊताई – थांब मला जरा फ्रेश होऊन जेऊदे.
.
बाकी – चिऊताई चिऊताई व्हॉट्सऍप उघड.
चिऊताई- थांब मला उद्याच्या ऑफिसची तयारी करू दे.
.
मग सगळं आवरल्यावर रात्री एक वाजता चिऊताई व्हॉट्सऍप उघडते
आणि बघते तर काय….
.
सगळे आपापलं व्हॉट्सऍप बंद करून झोपलेले आहेत.
.
मग चिऊताई गाणी ऐकते,
जुने फोटो बघते आणि
परत व्हॉट्सऍपच दार बंद करून घेते.
.
– अश्विनी सुर्वे

Posted

in

,

by

Comments

2 responses to “बिझी चिऊ ताई”

  1. ज्योती बेंद्रे Avatar
    ज्योती बेंद्रे

    खूप छान लिहिलीय कविता
    अगदी मनाला भिडली

  2. Vishal Avatar
    Vishal

    Chaan.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *