त्या दिवशी ठाण्याच्या तलावपाळी शेजारी बऱ्याच दिवसांनी अन्विता भेटली. तिचा ब्रेकअप झाल्यापासूनची हि आमची पहिलीच भेट.. एरवी दुखीयारी असणारी ती सिंगल आत्मा आज जाम खुश दिसत होती.. सोबत ७ ८ मुलींचा घोळका सुद्धा होता. एकमेकींना जोर-जोरात टाळ्या देत पूर्ण फूटपाथ त्यांनी व्यापून टाकलं होतं. एक पोट धरून खाली बसून खिदळत होती, एक तोंडावर हात पकडून हसण कंट्रोल करत होती.. आणि बाकीच्या मुली५ ६ दहीहंड्या फोडून येणारं दहीहंडी पथक जसं एका वेगळ्याच ऐटीत फिरतं तशा फिरत होत्या..
याच्या मागे होती एक लांबलचक पण छोटीशी गोष्ट.. ती हि अशी ..
एक साधी-सरळ मुलगी. अन्विता. कायम पंजाबी ड्रेस घालणारी. जीन्स-टीशर्ट घातले तरी अंगाला जास्त घट्ट बसणार नाहीत असे सैल, पण दिसायला अगदी सुंदर. टिप्पिकल मराठी मिडीयमची सोज्वळ मुलगी असते ना.. तशीचJ !!टपोरी मुल्लांच्या यादीत पहिल्या ३ नंबर मध्ये असणारी.वर्गातल्या लाजाळू मुलांचा काळजाचा ठोका चुकवणारी. एकदम पांढरी शुभ्र गोरी नसली तरी, गोजिरी, गोंडस.. गेली सात वर्ष एकाच मुलावर प्रेम करणारी.पण बोलतात ना.. लंगूर के हाथ में अंगूर.. तसच काहीसं होतं ह्यांच्या बाबतीत.
तन्मय आणि अन्विता नववीत आहेत तेव्हा पासून एकमेकांवर प्रेम करायचे. (‘एकमेकांवर’ ह्या शब्दाचा वापर इथे योग्य होणार नाही खर तर..),चूक कोणाचीही असली तरी सॉरी बोलायचं काम अन्विताचच. आपल्या टिप्पिकल भारतीय नारी पुरुषांना आदर सन्मान देतात ना.. त्यातलीच हि एक अन्विता.ती तर त्याला पती परमेश्वर मानून बसली होती. पण तन्मयच्या मनात काही तरी वेगळच होतं…
अन्विताला तिच्या प्रेमाच्या आंधळेपणात तन्मय बाहेर काय काय किस्से करायचा (किंवा सरळ शब्दात सांगायचं तर काय काय गुलछर्रे उडवायचा) ते कळलचं नाही. एकदा तिने त्याला एका मुलीसोबत CCD मध्ये हातात हात पकडून बसलेला बघितला.
‘हेलो, तन्मय.. कुठे आहेस रे..’, तिने उलट तपासणी करायला त्याला फोन लावला.
‘हा बोल अनु.. मी फ्रेंडच्या घरी आलोय practis करायला’
असं बऱ्याचदा झालं. तिला कोणाकडून तरी माहिती मिळायची आणि त्याची फेरतपासणी केली कि तो काहीतरी खोट बोलायचा. एक दिवस तर हद्दच झाली. तिच मुलगी सोबत असताना अन्विताने त्याला वेडे-वाकडे चाळे करताना रंगे हाथ पाहिलं.
‘तन्मय..!!’ त्याच्या शेजारी येऊन अन्विता रागावून म्हणाली.. ‘काय चालूय हे, कोण आहे ही!!’
‘कोण आहे म्हणजे… माझी गल्फ्रेंड आहे’, तन्मय एकदम निर्लज्ज होऊन बोलायला लागला.
अन्विताचा चेहेरा रडकुंडीला आला..‘मग मी कोण आहे ! आता २ तासापूर्वी आय लव यु बोललास न तू मला फोनवर’ ती आता रडायचीच बाकी होती. तिचा आवाज फाटायला लागला.
‘तन्मय, तू आम्हा दोघींना फसवतोयस.. हे चांगलं नाही..’
बर तुम्हाला वाटेल कि त्या दुसऱ्या मुलीला सुद्धा हा धक्काच असेल. पण तसं नव्हत. त्या मुलीला माहित होतं कि अन्विता त्याची (ऑपशनल) गल्फ्रेंड आहे.
‘हेल्लो, madam आप थोडा ज्यादा बात कर रही हो.. ये मुझे नही फसा राहा है.. पता है मुझे सब..’ त्याची डबल डेट मधेच बोलायला लागली. ‘so shut up and get lost’.
अन्विताला २ ४ दिवस नीट झोप सुद्धा लागली नाही.. ती त्याच विचारात गुरफटून गेली होती.
आता हि दर्दभरी दास्तान जास्त लांबवून सांगत नाही … सरळ पोइंटच्या मुद्द्यावर येतो.आजसुद्धा अन्विताने तन्मयला त्या त्याच्या हिंदी गल्फ्रेंड सोबत पाहिल होतं. आणि आज तर ते चक्क तलावपाळीच्या काट्यावर बसून भर दिवसा एकमेकांना ‘Kiss’ करत होते.
आता जर का हे बघणारी आमची जुनी अन्विता असती तर ती जोर जोरात रडत पाय आपटत निघून गेली असती.. पण ब्रेकअप नंतर तिच्यात बराच बदल झाला होता. कॉलेज फेस्ट, स्पोर्ट या सगळ्यात तिने स्वतःला रमवून घेतलं होतं. ५ ६ महिन्याच्या gap नंतर जी अन्विता बदलली होती तिच्या डोक्यात काय तरी वेगळीच खुराफात येत होती.
तलावपाळी म्हणजे काश्मीर मधला रमणीय बर्फाळलेला तलाव समजून ‘हनिमून’च पाहिलं पान उघडू पाहणाऱ्या त्या ‘चुम्माचाटी’ कपलची फजिती करायची प्लानिंग ह्या गोविंदा पथकामध्ये सुरु झाली.
‘नालायक’, ‘हलकट’ ह्याच्या वर एकही जड-अभद्र शिवी न देणारी अन्विता आणि तिच्या मैत्रिणींनी एकसुरात count down सुरु केला … १.. २.. ३.. आणि जोरात ओरडल्या.
‘ए झाट्टू ssss… !!’
अन्विता का खुश होती हे तुम्हाला कळलचं असेल.. कोणी तरी प्रेमात दगा दिला म्हणून नस कापून घेण, स्वतःला इतरांपासून अलिप्त ठेवण.. हि सगळी आपलं सुंदर आय्युष्य वाया घालवण्याची लाईन आहे. अन्विताने जगण्याचा जो मार्ग निवडला तो मला फार आवडला.. (#respect)
आणि म्हणून हि इंस्पायरिंग स्टोरी मी मुद्दाम तुमच्या सोबत ब्लोग वर शेयर केली. आयुष्य आणि त्यातली मजा कधीच कोणासाठी थांबत नाही. आणि कधी त्या गोष्टी थांबवूहि नये.कोणी तरी म्हटलंच आहे. ‘जो थांबला, तो संपला’.
तुम्हाला हि स्टोरी आवडली असेल तर मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेयर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा असे किस्से असतील तर आम्हाला नक्की कळवा. खालचा कॉमेंट बॉक्स तुमच्या साठीच आहे 😉 .
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
यशवंत दिडवाघ
पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय
Leave a Reply