जेष्ठ नाटककार, निर्माते, दिग्दर्शक, कवी-गीतकार आणि अभिनेते असलेल्या ‘बाळ कोल्हटकर’जन्म : सातारा, २५ सप्टेंबर १९२६, मृत्यू : ३० जून १९९४) यांचा आज स्मृतीदिन.
सातवी पर्यंतच शिक्षण झालेल्या बाळकृष्ण हरी कोल्हटकरांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच ‘जोहार’ हे नाटक लिहिले होते. लहानपणापासून ते लेखन करत असले तरी त्यांची प्रतिभा नाट्यगीतं व नाटकांमधूनच बहरली.
कुटुंबप्रधान कथानक, काळजाला भिडणारी गीते व संवाद, सामाजिक बांधिलकी जपणारे विषय ही त्यांच्या नाटकांची वैशिष्ट्ये.
वाहतो ही दुर्वांची जुडी, वेगळं व्हायचंय मला, दुरिताचे तिमिर जावो, एखाद्याचे नशीब, मुंबईची माणसे, विद्या विनयेन शोभते ही त्यांची गाजलेली नाटके. यातील काही नाटकांचे हजारहून अधिक प्रयोग झाले.
उठी उठी गोपाळा, निघाले आज तिकडच्या घरी, तू जपून टाक पाऊल जरा, आली दिवाळी दिवाळी, आई तुझी आठवण येते ही त्यांच्या नाटकांमधील काही प्रसिद्ध गीतं.
नाट्यसृष्टितील एक मानबिंदू असणाऱ्या प्रतिभावान नाटककार बाळकृष्ण कोल्हटकर यांना विनम्र अभिवादन.
त्यांची प्रसिद्ध नाटकांचा प्रत्यक्षात आस्वाद घ्यायला आपण मुकलो असलो तरी पुस्तकरूपात तो सुंदर अनुभव नक्कीच घेऊ शकतो.
एका बैठकीत सहज वाचून होणारी पुस्तकं आहेत ही. त्या काळातील सामाजिक वातावरण आणि शब्द, वाक्यप्रयोग तुमच्यातल्या लेखकाला नक्कीच खतपाणी घालतील.
– अश्विनी सुर्वे.
वेगळं व्हायचंय मला – ५०/- ₹
विद्या विनयेन शोभते – १५/- ₹
एखाद्याचं नशीब – ५०/- ₹
यातील सर्व पुस्तकं ऑनलाइन उपलब्ध नसली तरी मॅजेस्टिक, पुस्तकपेठ अशा ठिकाणी मिळतील.
Leave a Reply