बाप्पाला नवस केलेला.
आमची नित्या आणि अणव!
त्याचाच आशीर्वाद!
जुळी भावंड.
अतिशय गोड!
खूप गुणी!
अगदी नावासारखी.
बाप्पा तर त्यांचा फेव्हरेट.
अगदी, माय फ्रेंड गणेशा!
5 वर्षांचा नवस बोललेला.
नंतर जमलं तर बघू.
पण नाहीच जमलं.
मागचं वर्ष शेवटचं.
वर्षं कशी पटकन निघून गेली.
कळलंच नाही.
मुलं यावेळी एकदम शांत.
आठवणीत हरवून गेलेली.
त्यांना फार अनुभवताही नाही आलं.
त्यांची आत्ताशी तर झालेली दोस्ती.
‘आत्ता नाही येणार बाप्पा आपल्याकडे?’
चिमुरड्यांचे प्रश्नांवर प्रश्न.
हिने समजावलं थोडं.
‘आपल्याला नाही जमत आहे रे.
मग बाप्पाला त्रास होईल.
आवडेल का आपल्याला?’
पिल्लांना किती कळालं,
काय माहीत!
हम्म! मान डोलावली दोघांनी.
पुन्हा शांत बसली.
काहीशी उदास.
यावर्षी कोरोना.
भीतीने कुठं पाठवता पण येईना.
निदान डेकोरेशनला मदत म्हणून.
ही दोघं काय एवढं करणार म्हणा!
सेलोटेप दे, कागद पकड.
पण तेवढीच मज्जा.
भरभरून उत्साह.
यावर्षी ते ही नाही.
शांत झालेली एकदम.
काल रात्री.
दीड दिवसांच्या गणपतीचं आगमन.
बाहेरून मोठ्ठा आवाज.
गणपती बाप्पाsss..
दोघं पटकन खिडकीत पळाली.
मोरयाsss..!
जोरात ओरडली.
मनमोकळं हसली.
खिडकीतून मागे फिरली.
पुन्हा शांत.
आता मलाच राहवेना.
काहीतरी करायला हवं.
माझ्या पिल्लांच्या स्माईलसाठी.
रात्रभर जागलो.
यु ट्यूबवर सर्च केलं.
आणि हा कागदाचा बाप्पा बनला.
बाप्पानेच स्वतः बनवून घेतला.
सकाळी सरप्राईज!
दोघं जाम खुश!
उड्याच मारायला लागली.
टाळ्या वाजवत.
बाप्पा आला! बाप्पा आला.
नेहमीसारखं साग्रसंगीत नाहीये.
पूजा, वैगरे.
जमेल तेवढं.
आरती, नैवेद्य.
मुलांचा आनंद फक्त.
बाप्पा घेईल ना समजून?
घेईलच!
बाप्पा मोरया!
Leave a Reply