‘येथे कविता लिहून मिळतील’ कविता संग्रहात दुसऱ्यांसाठी मी बऱ्याच कविता लिहिल्या. पण ह्या कवितासंग्रहातली ‘दादर’ हि माझी सगळ्यात आवडती कविता… जी मी माझ्या स्वतःसाठी लिहिली होती. दादर मध्ये राहिलेल्या प्रत्येकाला हि कविता तितकीच भिडेल अशी आशा करतो..
“दादर”
माया मुंबईची
जणू काया आईची..
रंगीत साडीचा मखमली पदर..
दादर.. माझं अर्ध घर..
दंगलीने हादरलेली,
गर्दी घट्ट धरलेली,
अहोरात्र भार उचलत छातीवर,,
दादर.. माझं अर्ध घर..
दिवाळीच्या दिव्यांनी लखलखणारी,
मराठमोळी कोमल नारी,
जणू स्वर्ग अप्सरा नांदते जमिनीवर,
दादर.. माझं अर्ध घर..
मागेल ते ती लगेच देते,
पोटाची बुद्धीची भूक भागवते..
आहे एक अनोखं ज्ञानाचं आगर,
दादर.माझं अर्ध घर..
जपते सारे मराठी सेवक,
घडले येथे अनेक लेखक,
कवी, नाटककार, तेंडूलकर..
दादर.. माझं अर्ध घर..
माझं बालपण, माझं शहाणपण,
मला मिळालेली संस्काराची चादर..
दादर.. माझं अर्ध घर..
जरी असले ह्या भूमीला हजारो शाप,
घडवत राहील ही माता बापांचे बाप,
गरजेल मराठी इथूनच,
इथूनच उमटेल साऱ्याजगी मराठीची छाप..
‘येथे कविता लिहून मिळतील’ कवितासंग्रहामध्ये आणखीन खूप कविता आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील.. कवितासंग्रह विकत घेण्यासाठी संपर्क करा: ‘आयडीअल बुक डेपो’, दादर (पश्चिम). तुमचे अभिप्राय जरूर कळवा. आणि हि कविता आवडली असेल तर दादर मधल्या प्रत्येक मित्राला नक्की ऐकवा.. कारण दादर खरच खूप ऑसम आहे !! 🙂
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
यशवंत दिडवाघ
पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.
Leave a Reply