‘लहानपण’ म्हणजे आपल्या आयुष्यातला सगळ्यात श्रीमंत काळ, ज्यात नवीन शर्ट, नवीन बूट हीच आपली property असते. त्या दिवशी ट्रेन मधून घरी जाताना एक १२-१३ वर्षाचा मुलगा माझ्या समोरच्या सीटवर बसलेला. त्याला बघून जाणवलं कि आता तशी property माझ्याकडे नाहीय. आता मी त्या वयाला फक्त आठवू शकतो, त्या वयात जाण कधीच शक्य नाही.
वय लहान असल्याचे खूप फायदे असतात. पटकन झोप लागते, कुठलं नातं जपण्यासाठी धडपड करावी लागत नाही, उलट आपली नातीच आपल्यासाठी धपडत असतात. डोक्यात येणारे विचार एकदम निरागस असतात आणि मग सगळं जग आपल्याला निरागस वाटतं.
खिडकीतून येणारी हवा त्याचे २ इंची डोक्यावरचे केस उडवत होती. कदाचित त्याच्याही शाळेत केसांच्या शिस्तीवर लक्ष दिलं जात असणार. मस्तपैकी कोरेकरकरीत बूट काढून पायाची मांडी घालून तो एका बाजूला टेकून झोपला होता. मी जरासे पाय लांबवले आणि त्याच्या बुटांना थोडासा धक्का लागला. आपल्या property वर कुणी हल्ला करतंय का या विचाराने तो पटकन डोळे उघडून जागा झाला आणि बूट व्यवस्थित आहेत का ते बघू लागला. मला त्याची हि reaction जाम आवडली. मी थोडासा हसलो. तो पण मला, आणि नंतर बुटांकडे बघून हसला. आणि डोळे मिटून पुन्हा त्याच्या त्या निरागस दुनियेत हरवून गेला.
एक-दोन स्टेशनं गेली, आणि मी बघतोय तर तो माझ्या मिशांकडे (मिटलेल्या डोळ्यांच्या फटीतून) बघत त्याच्या नसलेल्या मिशांवरून हात फिरवू लागला. एक वेगळंच हास्य त्याच्या चेहऱ्यावर मला दिसलं. त्याची (चोरटी) नजर माझ्या मिशांवरून माझ्या डोळ्यांकडे गेली आणि तो एखाद्या फेसबुक स्मायली सारखा खुलून हसला. मी हि मन मोकळं करून त्याला मोठ्ठी smile दिली. त्याच्या घरच्यांना कळेना कि हे दोघं अचानक का हसू लागलेत!
आम्ही दोघ एकमेकांना बघून हसलो.. कारण.. त्याला माझ्या मिशा हव्या होत्या आणि मला त्याचे ते नवीन बूट!
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
यशवंत दिडवाघ
पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय
Leave a Reply