इ-साहित्य प्रतिष्ठानने गेल्या १४ वर्षांमध्ये हजारो वाचकांना एका क्लिकवर ‘इ-साहित्याचा’ खजिनाच उलगडून दिलाय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे साहित्य आणि ‘इ-बुक्स’ कायदेशीर आहेत. २००४ पासून कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठानने हजारो पुस्तकांचं प्रकाशन आणि लाखो वाचकांचं नेटवर्क उभं केलं आहे. त्यांच्या वेबसाईटवर कथा, कादंबरी, काव्यसंग्रह, ऐतिहासिक साहित्य, बालसाहित्य, प्रवासवर्णन, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर पुस्तकं उपलब्ध आहेत. ती वाचण्यासाठी आणि ‘इ-साहित्य प्रतिष्ठान’ बद्दल माहिती घेण्यासाठी तुम्हाला फक्त खालील बटणावर एक क्लिक करण्याची गरज आहे. तर वाचत रहा! आणि यशवंत व्हा!