अनेकजणांना वाचनाचं महत्व माहीत असतं पण एखादं पुस्तक वाचायला घेतलं की कंटाळा येतो, झोप येते. कधीकधी उत्साहात वाचन सुरू केलं तरी काही पानं वाचल्यावर पुस्तकाचा विषय किंवा लेखकाची शैली आवडत नाही, मग चिडचिड होते आणि कधी इतरांनी सांगितलंय म्हणून तेवढं एक पुस्तक वाचलं जातं तर कधी पुस्तक वाचनाचा नादच सोडून दिला जातो.
असं का होत असेल?, मला आवडतील अशी पुस्तकं कशी निवडायची आणि नव्याने वाचनाला सुरुवात कशी करायची याची माहिती या लेखातून घेऊ.
१. योग्य पुस्तकाचा शोध
सर्वात आधी तुम्हाला कोणत्या प्रकारचं साहित्य आवडतं आणि कशासाठी वाचत आहात हे ठरवा.
उदा: जर तुम्हाला कथा वाचायला आवडतात तर त्या मनोरंजन म्हणून वाचायच्या आहेत की मोटिव्हेशन म्हणून हे ठरवा आणि त्यानुसार पुस्तक निवडा.
२. हलक्या-फुलक्या भाषेतील पुस्तकांपासून सुरूवात
आपला मेंदू हा एका स्नायू (मसल्स) सारखा आहे. त्याला नवीन गोष्टींची सवय होण्यासाठी सरावाची गरज लागते. आणि जिममध्ये व्यायामाची सुरुवात जशी आपण कमी वजनापासून करत पुढे वजन वाढवत नेतो, तसंच वाचनाची सुरुवातही सहज-सोप्प्या भाषेतील पुस्तकांपासून करा.
३. पुस्तकाचा संक्षिप्त आढावा
जे पुस्तक वाचायचं आहे, त्याबद्दल पुरेशी माहिती घ्या. जसं की, नक्की विषय काय आहे, कोणत्या मुद्द्यावर भर दिला आहे, तो मुद्दा तुम्हाला आवडणारा आहे का, लेखकाचं नाव, त्यांची आधीची पुस्तकं, इ. त्यासाठी मलपृष्ठ/तळपृष्ठ, प्रस्तावना, मनोगत, अनुक्रमणिका वाचायची सवय ठेवा. आपण एखादा चित्रपट किंवा सीरिज बघण्याआधी ट्रेलर, कोणी काम केलंय वगैरे बघतो तसंच.
४. इतरांना आवडलेली पुस्तकं तुम्हाला आवडायला हवीतच असं नाही
बऱ्याच जणांचा वाचनप्रवास या एका कारणामुळे थांबतो. ते एखाद्या गाजलेल्या किंवा इतरांनी सजेस्ट केलेल्या पुस्तकापासून सुरुवात करतात आणि नाही आवडलं की काही पानांनंतर कायमचं थांबतात.
तुम्हाला एखादं पुस्तक नाही आवडलं तर कोणताही किंतु परंतु न ठेवता ते पुस्तक बाजूला ठेवून दुसरं पुस्तक वाचायला घ्या.
५. वाचनाची वेळ आणि वातावरण
सुरुवातीला वाचनाची एक निश्चित वेळ ठरवा आणि त्या वेळेत रोज अर्धा तास तरी वाचायला बसा.
– वाचायला बसायला त्यावेळी शांतता आणि आरामदायी बैठक व्यवस्था असेल असं पाहा.
जेवताना, टीव्ही किंवा मोबाईल पाहताना वाचनं टाळा.
सुरुवातीला शक्यतो झोपून, लोळत वाचू नका.
६. वाचनाची नोंदवही किंवा डायरी व इतर गोष्टी
– वाचनाची एक डायरी तयार करा ज्यात वाचलेल्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव व तुम्हाला आवडलेल्या गोष्टी लिहीत जा.
– पुढे वाचायची आहेत अशा पुस्तकांची यादी बनवा.
– बाहेर जाताना एखादं पुस्तक कायम सोबत ठेवा.
– तुमच्या भागातील लायब्ररी, पुस्तकांच्या दुकानांमध्ये जात जा.
७. आवडलेल्या पुस्तकांबद्दल बोला
– तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाची माहिती इतर वाचक मित्रांना द्या.
– वाचनाच्या ग्रुप्समध्ये सहभागी व्हा व प्रतिक्रिया देत जा.
– फेसबुक, इंस्टा, टेलिग्राम, व्हॉट्सऍपवर असे अनेक ग्रुप आहेत जिथे वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल माहिती मिळते.
– न आवडलेल्या पुस्तकावर नकारात्मक अभिप्राय देणे टाळा.
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
अश्विनी सुर्वे
अश्विनी लहानपणापासून वाचन वेडी आहे.. इतकी की भेळ खाल्लेला कागद सुद्धा तिने न वाचता फेकला नाही (अर्थात कचऱ्याच्या डब्यात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.
Leave a Reply