Four Agreement marathi book review

‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.

४० पेक्षा अधिक भाषांमध्ये भाषांतरीत, ८ वर्ष न्यूयॉर्क टाईम्सचं बेस्ट सेलर असलेल्या ह्या पुस्तकाच्या लाख्खो प्रती जगभरात विकल्या गेल्या आहेत. ह्यात लेखक डॉन मिग्युल रुईझ ४ फार सोप्या विषयांवर भाष्य करतात. आपण आपल्यावर नकळत काही मर्यादा लादून घेतल्या आहेत. हे पुस्तक वाचता वाचता तुम्ही त्यातून मुक्त होता.

वाचनाची आवड असणाऱ्यांना हे पुस्तक खूप हलक वाटेल, पण पुस्तकाच्या शेवटी नक्कीच तुमच्या ज्ञानात काहीतरी जड भर पडलेली जाणवेल. गरज नसताना सुद्धा आपण नक्की कसलं टेन्शन घेतो याची जाणीव होईल आणि त्याला आनंदात कसं रुपांतरीत करता येईल याचं गमक तुम्हाला समजेल.

पुस्तकात मांडलेले मुद्दे खालील प्रमाणे.

  • कमीत कमी विषारी शब्द वापरा – ह्यात गॉसिप करणाऱ्यांना लेखक कालाजादू करणाऱ्या लोकांप्रमाणे बघतो. आणि चांगले बोलणारे हे प्रत्यक्ष जादुगार असतात. ते त्यांच्या शब्दांमधून हवी ती गोष्ट निर्माण करू शकतात. (Be Impeccable With Your Word)
  • वैयक्तिक पातळीवर सगळ्याच गोष्टी बघू नयेत (Don’t Take Anything Personally).
  • कुठलीही गोष्ट समजून घेत असताना किंवा बघताना (कल्पनेचे घोडे पळवून) त्या गोष्टीचा वेगळा अर्थ काढू नये. (Don’t Make Assumptions)
  • नेहमी तुमचे १०० टक्के द्या (Always Do Your Best.) ह्या वाक्यात एक वेगळाच अर्थ आहे तो लेखक त्यांच्या हुशार शब्दरचनेत मस्त मांडतात. तो अर्थ त्यांच्या शब्दात वाचलेलाच बरा. (हे पुस्तक विकत घ्या आधी.. चला पटकन!)

तुम्ही हे पुस्तक मराठीत घ्या किंवा इंग्रजी मध्ये, त्यातली भाषा खूप सोप्पी असल्यामुळे ते पटकन समजत. नवीन नवीन इंग्रजी पुस्तकं वाचण्यास सुरुवात करू इच्छीणाऱ्या वाचकांनी ह्या पुस्तकापासून सुरुवात करायला हरकत नाही. जास्तीत जास्त १०-१५ वेळाच तुम्हाला शब्दकोश पाहावा लागेल.. बस्स!

पुस्तकाची लिंक : मराठी आवृत्ती इंग्रजी आवृत्ती


 पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.

वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.

For Other Products by the same brand Click here

वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.


Yashwant didwagh

यशवंत दिडवाघ

पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!

Facebook Profile

Instagram Profile

ता.क.१.  तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क.२ तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.


by

Comments

One response to “‘फोर अग्रीमेंट’ – जीवनात असामान्य कार्य करण्यासाठी चार सिद्धांत वापरा.”

  1. Swapnil Chvhan Avatar

    मस्त लिहिलंय. अगदी मोजक्या शब्दात पूर्ण माहिती सांगितलीये पुस्तकाबद्दल की लगेच वाचावं असं वाटतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *