तरुण मंडळींची नजर ‘सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग अ फ*’ ह्या नावाने बऱ्यापैकी आकर्षित करून घेतली. लेखक मार्क मेंसन सुद्धा एक तरुणच, मग त्याला आजकालच्या तरुणाईची नस बरोबर सापडली. आणि हे पुस्तक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बेस्ट सेलिंग लिस्ट मध्ये गणल जाऊ लागलं.
ह्या अशा नावामुळे आत काय लिहिलंय ह्याची उत्सुकता ताणली जाण साहजिकच आहे. पुस्तकं जाणीवपूर्वक सल्ला मसलत करून वाचणाऱ्यांना ‘हे वाचाच!’ असं सांगणारी मंडळी सुद्धा आहेत, आणि हे नाव तसं ‘COOL’ ‘Happening’ वाटतंय म्हणून पण पुस्तक वाचायला घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे, so लेखकाने अभ्यासू आणि मस्तीखोर अशा दोन्ही प्रकारच्या तरुणाईला जिंकून घेतलं, असं म्हंटलं तरी हरकत नाही.
हा झाला नावाचा मुद्दा. आता त्याच्या आतमध्ये काय लिहिलंय ह्या कडे जरा लक्ष देऊया.
मानसशात्राचा खोल अभ्यास असल्यामुळे ह्यात मांडलेल्या प्रत्येक मुद्याला लेखक पुराव्यानीशी सिद्ध करून दाखवतो. आणि वाचता वाचता त्या गोष्टी आपल्याला सुद्धा पटत जातात. बरीच सत्य ‘साखर शब्दात’ न लिहिता सडेतोड सरळ शब्दात लिहिली आहेत. प्रथमतः ती पटवून घ्यायला मन तयार होत नाही. नंतर लेखकाच्या लेखन शैलीत तुम्ही आपोआप वावरू लागता. तोंडावर स्तुती सुमनं उधळणारा स्वभाव तेवढ्या वेळापुरता कुठे तरी हरवून जातो. लेखकाचे कठोर शब्द पटू लागतात.
आधीच्या जमान्यातली लोकं मंदिरात जाऊन, देवादिकांच्या कथा ऐकून स्वतःला शिस्त लावून घेत. आजच्या तरुणाईला ते क्वचितच पटेल. पण ह्या पुस्तकात लेखक एकविसाव्या शतकातल्या (नास्तिक) लोकांचा (अप्रत्यक्षपणे) सस्तंग कसा असेल ह्याची मुल्ये ह्यात सांगतो.
थोडक्यात सांगायचं तर, आधुनिक जगतात सन्यासी बनण्याचा प्लान तुम्हाला हे पुस्तक वाचून बनवता येईल. (लग्न-प्रपंच करता करता)
कधीतरी वेळ काढून ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका तेवढी वाचा, मग मी काय बोलतोय त्याचा अंदाजा येईलच. आणि
हो.. एकदा वाचून झाल्यावर ते अजून एकदा वाचून काढावसं वाटण साहजिक आहे. म्हणून मी हे पुस्तक विकत घेण्यावर जास्त भर देईन.
पुस्तकाची लिंक : Subtle Art of Not Giving a F*ck (इंग्रजी आवृत्ती)
सटल आर्ट ऑफ नॉट गिविंग अ फ* (मराठी आवृत्ती)
पुस्तकं वाचण्यासाठी आम्हाला अतिशय उपयुक्त वाटलेलं असं हे BOOK STAND ज्याचा तुम्ही iPad , Mobile किंवा Kindle यातून वाचन करताना सुद्धा उपयोग करू शकता.
वाचकांच्या विनंतीवरून आम्ही पुस्तक वाचण्यासाठी आणि इतर लिखाण किंवा laptop सोयीस्कर रित्या वापरता यावा म्हणून जो टेबल गेली ४-५ वर्ष वापरत आलो आहोत त्याची लिंक येथे दिली आहे. Click Here.
For Other Products by the same brand Click here
वाचनाच्या आवडीला पूरक असं साहित्य आम्ही वेळो वेळी तुम्हाला सांगत राहू.
यशवंत दिडवाघ
पुस्तकांपासून लांब पळणारा मी, कधी पुस्तकांमध्ये रमायला लागलो कळलंच नाही. पण आत्ता… मी पुस्तकांच्या प्रेमात पडलोय. तुम्ही पण बघा एकदा पडून (अर्थात प्रेमात)!
ता.क.१. – तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्ही BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.
ता.क.२– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.
तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहतोय.
Leave a Reply