word power made easy Norman Lewis marathi book review

WORD POWER सोप्या शब्दात!

हे पुस्तक बिलकुल वाचू नका! असं त्या पुस्तकातच लिहिलंय.

हे अभ्यासाव.

खूप आकर्षक शब्द, त्यांची फोड, त्या शब्दाचा जन्म, त्या शब्दाची इतर भावंड, त्यांची माहिती आणि उपयोग अशी संपूर्ण माहिती तुम्हाला सोप्या शब्दात मिळते. मग ते शब्द पाठ करावे लागत नाहीत, आपोआप लक्षात राहतात. आपला उद्देश स्वतःची इंग्रजी शब्दसंपत्ती वाढवणे हा आहे.

पुस्तक वाचायला(अभ्यासायला) सुरुवात करण्याआधी काही टिप्स:

  • कोणत्याची धड्याच्या खालील प्रश्नसंच दुर्लक्ष करून सोडू नका.
  • पुस्तकासोबत बोला. समजवलेल्या प्रत्येक शब्दाचा मोठ्याने उच्चार करा.
  • पुस्तक तसं मोठं आहे (हलकं देखील), पटकन धावती नजर टाकून वाचन करायच असल्यास स्वतःच्या नोट्स काढा.
  • जास्तीत-जास्त २-३ सेशन्स करा एका बैठकीत. तासाभराच्या वर उगाच स्वतःला ताणून वाचत बसण्याचा उपयोग नाही.
  • वाचल्या-वाचल्या शब्द लक्षात रहात नाहीत म्हणून टेन्शन घेऊ नका. ह्यातलं सगळच्या सगळं रट्टा मारण तसं अशक्यच आहे.
  • वाचून झालेले, तुम्हाला समजलेले शब्द रोजच्या वापरात आणायचा प्रयत्न करा.
  • रोज थोडा तरी वेळ स्पेशिअली ह्या पुस्तकासाठी राखून ठेवा. मग तुमच्या स्पीड नुसार पूर्ण वाचून होईल तेव्हा होईल.

ह्या पुस्तकातील प्रश्न सोडवता सोडवता तुम्ही स्वतः (शब्दांनी) श्रीमंत झाल्याचा फील तुम्हाला येत राहीलच. (मी तर एकदा आमच्या सिनिअर प्रोफेसरची इंग्लिश मध्ये हेल्प केली होती, ह्या पुस्तकातल्या  शब्दभांडारामुळे. and no doubt he was impressed!)

प्रगल्भ इंग्लिश शब्दकोश तयार करायला ह्या पुस्तकाचा खूप फायदा होतो. मला कायम असं वाटतं कि अशा टाईपचं मराठी भाषेतील शब्दांची माहिती देणारं पुस्तक कोणी तरी लिहावं (तसं कोणतं पुस्तकं बाजारात उपलब्ध असेल तर प्लीज लवकरात लवकर कळवा.)

एखादा शब्दकोश वाचन आणि हे पुस्तक वाचन ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ह्या पुस्तकाच्या पूर्ण अध्ययनानंतर तुम्ही स्वतःच एक चालता फिरता शब्दकोश बनून जाता. बस्स.. अवघड आहे ते हे पुस्तक पूर्ण वाचून काढन. आणि ते कितीही वाचलं तरी कमीच वाटतं. मी स्वतः गेली २ वर्ष वाचतोय.. आणि आयुष्यभर पुन्हा पुन्हा वाचीन.. आणि लोकांना वाचण्यास प्रवृत्त करीन.

पुस्तकची लिंक : Word Power Made Easy by Norman Lewis

ता.क. १- तुमच्या आवडीची पुस्तकं व्यवस्थित ठेवण्यासाठी मी BOOK BAGS बनवल्या आहेत, त्या नक्की पहा.

ता.क. २– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहतोय 🙂 .

Leave a Reply