तुमच्या कवी मित्रासाठी

तुम्हाला असं वाटतं का कि तुम्ही कविता लिहिली आणि मित्रांना दाखवली तर ते तुमच्यावर हसतील? किंवा तुमच्या घरातले तुम्हाला चिडवतील?

तुम्हाला काहीही वाटू दे, माझ्या मते तरी जर का तुमच्या मनातली भावना तुम्ही कवितेत मांडली तर ती वाचणारा तुमच्यावर इम्प्रेस होतोच होतो! (माझ्यासोबत कित्तेक वेळा झालाय असं!) म्हणून तर आजकाल गाणी लिहिणारे, ओपन माईक्स मध्ये कविता सादर करणारे किंवा Rapper लोकं यांना कमालीचा रिस्पेक्ट मिळताना दिसतोय.

तुम्हाला तितकी प्रसिद्धी मिळेल कि नाही हा पुढचा भाग आहे (atleast तुम्ही लिहिल्या-लिहिल्या तरी पॉप्युलर होण्याचे चान्सेस कमी आहेत). पण हि लिहिण्याची प्रोसेस इतकी मस्त आहे कि त्यातून काही फायदे नक्की होतात. त्यातले बेस्ट ५ फायदे हे असे –
फायदा नंबर १ : तुम्हाला नक्की कसं वाटतंय हे समजायला मदत होते.
हो, हे खरंय – आयुष्यात कन्फ्युजन भरे क्षण बऱ्याचदा येतात. कदाचित मित्रासोबत भांडण झालं असेल आणि तेव्हा तुम्हाला कळलं नसेल कि ह्यावर काय प्रतिक्रिया द्यावी. पण ते कुठे तरी लिहून काढल्यामुळे, तुम्ही तुमच्या भावनांना ओळीत उभं करून ठेवता. आणि मग तुम्ही प्रत्येक इमोशन कडे क्रमाक्रमाने थंड डोक्याने बघू लागता. कधी तुम्ही उत्साही, खूष, रागात किंवा दडपणाखाली- किंवा ह्यापैकी २-३ मूड मध्ये एकसाथच आहात, नक्की भावनांचं स्टेटस काय आहे? हे समजायला वेळ लागत नाही. अशाने तुम्ही स्वतःला ओळखू लागता.
फायदा नंबर २ : तुम्ही काहीतरी युनिक गोष्ट अनुभवलेली असते!
तुम्ही जो विचार केलात तसा या आधी कोणीच केला नाहीय, आणि म्हणून तुम्ही स्वतःला स्पेशिअल फील करवत असता. ह्यावर कविता लिहून हा युनिक अनुभव तुम्ही जगापुढे मांडू शकता.

फायदा नंबर ३ : कविता म्हणजे स्वानुभव व्यक्त करण्याचं बेस्ट माध्यम.
आपल्या आयुष्यात असे काही अनुभव असतात जे तुम्हाला लोकांना मोठ्ठ्याने ओरडून सांगावेसे वाटतात. मग तुम्ही प्रेमात पडलात, तुम्हाला तुमच्या आई-वडिलांचा अभिमान वाटतोय, किंवा तुम्हाला एकटं-एकटं वाटतंय; ह्या भावना तुम्हीला खरंच कुठेही ओरडून सांगता येणार नाहीत (अपवाद – हे असं बहुदा सिनेमात होतं). ह्यांना तुम्ही कवितेत मांडलत तर नक्की हे साध्या होऊ शकतं. त्या भावना हव्या तिथे पोहोचवता येतात.

फायदा नंबर ४ : अवघड वेळेत बळ देणारी कविता.
तुम्हाला हव्या त्या कॉलेजला प्रवेश मिळाला नाही, किंवा तुमचं नुकतच ब्रेक-अप झालंय; ज्यामुळे तुम्ही उदास आहात. तर टेन्शन घेऊन काहीच होणार नाही. कारण भूतकाळात जाऊन सगळं नीट करण्याची शक्ती कोणाकडेच नसते. पण त्यावर कविता लिहिलीत तर नक्कीच तुम्हाला थोडं हलकं वाटेल. भावनांना एक्स्प्रेस न करता त्यांना कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात डांबण्यापेक्षा, लिहून व्यक्त हवा, बरं वाटेल. कविता लिहीनं म्हणजे तुमच्याच शब्दांनी तुमच्या मनावर शस्त्रक्रिया करण्यासारखं आहे, जी पूर्णपणे मोफत आहे 😉 . तुमची अशी कविता जेव्हा कोणी दुसरी व्यक्ती वाचते किंवा ऐकते, तेव्हा तुम्हाला समजतं कि तुम्ही एकटे नाही. अशी परिस्थिती याआधी बऱ्याच जणांवर आली होती. कविता तुम्हाला अशा वेळी मानसिक आधार देते.

फायदा नंबर ५ : जगाला बघण्याचा वेगळा नजरीया.
‘चांगल्या’ कवितेची ‘उत्तम’ कविता करण्यासाठी तुम्हाला तुमचा तुमच्या विषयाकडे बघण्याचा नजरीया बदलावा लागतो. यामुळे नकळत तुमची निरीक्षण शक्ती वाढते. तुम्ही डोळे-मन-विचार खुले ठेवून जगू लागता. आणि आयुष्य खऱ्या अर्थाने वसूल होतं.


म्हणून म्हणतो कविता लिहिणं चालू ठेवा, आणि जे ऑलरेडी लिहितायत किंवा लिहायचे थांबलेत किंवा कधी पासून लिहायला उद्यापासून सुरुवात करू असं म्हणतायत त्यांना हे आर्टिकल नक्की शेयर करा!

कविता लिहिता-लिहिता तुम्हाला कोण-कोणते युनिक अनुभव आले ते आम्हाला www.YashwantHo.com  या संकेतस्थळावर नक्की कळवा. तुमची कविता लिखाण नक्की शेयर करा. जागतिक कविता दिनाच्या शुभेच्छा.

Related Posts

Leave a Reply