म्हणूनच लोकं लग्न करत असावीत.!

माणसाला एका माणसाची गरज असते. त्याच्या आत्म्याला एका दुसऱ्या आत्म्याची गरज असते. म्हणूनच लोकं लग्न करत असावीत बहुदा..

त्या आत्म्याला कुठल्या शरीराचं कवर आहे, ह्याचा त्या नात्याशी काही एक संबंध नसतो. हा.. संबंध असतो, पण तो फक्त एका ठरावीक वयापर्यंत. जेव्हा त्याचा स्वतःचा आत्मा एका शरीराला शोधत असतो फक्त तो पर्यंतच. शरीर.. जे त्याची भूक भागवेल, शरीर.. जे त्याच्या सोबत डीपी मध्ये छान दिसेल.

वय सरलं कि दुसऱ्याचं शारीरिक सौंदर्य दिसणं बंद होतं. कारण आता भूक असते ती आत्मीक समाधानाची, व्यक्त होण्याची, सांभाळण्याची, सांभाळुन घेण्याची..

याआधी ते वर वरच बोलत आलेले असतात, ‘चेहेऱ्यात काय आहे, माणसाचा स्वभाव चांगला हवा!!’ आणि मुळात चांगला स्वभाव जाणून घेण्याइतपत चांगला स्वभाव ह्यांचाच अजून झालेला नसतो.  मग उगाच खोट्या आवडी, खोटी सत्य; ह्यांच्या जाळ्यात आपण अड़कून जातो. ह्यातून बाहेर पडण्यासाठी ‘आपण ह्या जाळ्यात अडकलोय’ हे समजण्याजोगा स्वभाव तयार झाला की बस्..

गौतम बुद्ध, भगवद्गीता.. ह्या सगळ्यांचे सार समजायला लागतात. निसर्गात जे काही स्वयंभू आहे त्या प्रत्येकाशी नातं जाणवू लागतं. तुम्हाला बिलगुन गेलेली वाऱ्याची झुळुूक, रखरखतं उन, रात्रीची शांतता, सगळ्या सगळ्यांसोबत संभाषण होतं तुमचं. नंतर सगळ्यांशी बोलणं थांबवून स्वतःशी बोलण सुद्धा सुरु होतं थोड़ा वेळ. आपणच आपल्या प्रश्नांची उत्तरं देऊन जातो शेवटी, आणि तेव्हा कुठे हा आत्मा शांत होतो..

ह्या तुमच्या शांत आत्म्याला बघून तृप्त होणारा अजून एक आत्मा असेल बघा.. तिथेच.. तुमच्या बाजूला बसलेला. तुमच्या चेहऱ्यावरचं ‘समाधान’ त्याला ती त्याची कमाई वाटते. तुम्ही खूश आहात बघून त्यालाही अजून थोडं जगावं वाटतं. कदाचित ह्यालाच म्हणतात, ‘त्याचं येणं, आणि जगण्याला अर्थ येणं’.

चला उठा आता जास्त वेळ दवडू नका. ह्या आत्म्याला आपलंस करा. त्यासोबत बोला, चाला, पूर्वी कधीच न अनुभवलेल्या गोष्टीना सुरुवात करा. म्हणजेच.. त्या आत्म्यासोबत लग्न करा.. कारण, असं म्हणतात की.. आत्म्याला एका आत्म्याची गरज असते, आणि म्हणूनच लोकं लग्न करत असावीत.!

Related Posts

 • Reply Prasad Kalwankar July 8, 2018 at 2:50 pm

  chan lihta sir tumhi👌👌❤️🙌

 • Reply Adv Sadashiv Kale July 8, 2018 at 2:51 pm

  Khup chhan lihile aahe

 • Reply Sunetra Bhosale July 8, 2018 at 2:51 pm

  Chann lihlay thodkyat…kharach ahe

 • Reply Vijay Mane July 8, 2018 at 2:52 pm

  अप्रतिम आहे लेख

 • Reply Amol Kale July 8, 2018 at 2:52 pm

  Khup chhan

 • Leave a Reply