तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?

‘तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?’ मध्ये लेखक रॉबिन शर्मा ह्यांनी १०१ टिप्स दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही सोप्पं, समाधानी आणि सुखी आयुष्य जगायला शिकाल. काही टिप्स अशा सुद्धा आहेत कि ज्या तुम्हाला कसा-बसा १०१ आकडा गाठावा म्हणून लिहिल्या सारख्या वाटतील सुद्धा.. (निदान मला तरी असं वाटलं, प्रत्येकाचा दृष्टीकोन आहे). पण हे मात्र तितकंच खरं कि, ह्यातल्या कमीत-कमी ६० ते ७० टिप्स तरी तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुम्ही त्यांचं अवलंबन करायला सुरुवात देखील कराल. (मी करतोय फॉलो!).

वाचता-वाचता आयुष्यात कोणत्या गोष्टींवर फोकस असावा आणि कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं हे समजायला लागतं. लेखक तुमच्या दैनंदिन घडामोडींना एक वेगळाच नजरीया देऊन जातो. चांगले पालक बना, शांत राहायला शिका, खूप हसा, अशा सिम्पल नावांचे मुद्दे; जे तसं पाहायला गेलं तर खूपच साधे आहेत, पण लेखकाने त्यासाठी लिहिलेले मोजकेच ३००-४०० शब्द त्यामागचा मतितार्थ समजावून जातात.

ह्या पुस्तकाचं नावच इतकं आकर्षक आहे कि तुम्ही त्याकडे आपोआप खेचले जाता. वाचनाची सवय नसलेल्या लोकांना सुद्धा हे पचवता येईल इतक्या सरळ, थेट आणि सोप्या भाषेत लिहिलेलं पुस्तक. प्रत्येक मुद्दा कमीत कमी शब्दात आणि दिग्गज व्यक्तींच्या विचारांची सांगड घालून समजवला जातो, म्हणून ते पटकन समजतात. आणि वाचता-वाचता मिळणारे हे आयुष्याचे धडे आपले डोळे उघडत जातात.

‘तुमच्या मृत्यूनंतर कोण रडणार आहे?’(मराठी आवृत्ती)

Who Will Cry When You Die? (इंग्रजी आवृत्ती)

ता.क.१:- वाचनाची सवय नसलेल्या लोक्कांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचायचंय! याचा उपयोग तुम्हाला वाचनशक्ती वाढवण्यात होईल. इथून पुढे आपण थोडी अजून बुद्धीसाठी-आकलनासाठी जड पुस्तकं वाचायला घेणार आहोत, त्यासाठी आताच तयार व्हा! पुन्हा बोलू नका यशवंतने सांगितलं नाही, एकटाच चांगली-चांगली पुस्तकं वाचतो हा शहाणा!

ता.क.२:– तुमच्या वाचण्यात असं कोणतं पुस्तक आलं असेल, ज्याने तुमचा जगण्याचा दृष्टीकोन बदलला किंवा ते तुम्हाला इतकं आवडलं कि तुम्ही त्याबद्धल भेटेल त्या व्यक्ती सोबत बोलू लागलात. (थोडक्यात असं पुस्तक जे तुम्हाला वेड लावून गेलं, चांगल्या अर्थाने 😛 ). अशा पुस्तकांबद्धाल आम्हाला जरूर कळवा. इथे आम्ही त्या पुस्तकाबद्धलचा तुमचा अभिप्राय तुमच्या नावासोबत पब्लिश करू. चांगली पुस्तकं सर्वांपर्यंत पोहचायला हवीच.

 

 

Related Posts

Leave a Reply